हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचे सेवन
सातत्याने वातावरणात बदल होत आहे. वातावरणात बदल झाल्यानंतर आरोग्याची योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. थंडीच्या दिवसांमध्ये विशेष करून केस आणि त्वचेची काळजी घ्यावी. थंडीमध्ये वातावरण थंड असल्यामुळे केस आणि त्वचेला इजा होते. हिवाळ्यात केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, टाळूवर खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोटीन ट्रीटमेंट करून घेतात, मात्र याचा फारसा फायदा केसांना होत नाही. त्यामुळे केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी आहारात बदल करून पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी कोणत्या भाज्यांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातमीसाठी इथे क्लिक करा
पोषक घटकांनी समृद्ध असलेले पालक अनेक आजारांवर प्रभावी आहे. पालकचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. पालकमध्ये विटामिन सी, के, ए, लोह इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात पालकचे सेवन करावे. पालक खाल्यामुळे केसांची वाढ निरोगी होते आणि केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
केसांच्या वाढीसाठी लीफ कोबीचे आहारात सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. बाजारात लीफ कोबी सहज उपलब्ध होते. केसांना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी लीफ कोबी मदत करते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात लीफ कोबीचे सेवन करावे.
पोषक घटकांनी समृद्ध असलेला पुदिना शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करतो. पुदिन्यामध्ये विटामिन ए, सी आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मँगनीज, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पुदिन्यापासून तुम्ही चटणी, सरबत किंवा इतर पेय बनवू शकता. पुदिन्याचे सेवन केल्यामुळे टाळूवरील जळजळ कमी होते आणि केसांना खाज येत नाही.
विटामिन सी युक्त ब्रोकोलीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. ब्रोकोलीमध्ये कोलेजनचे प्रमाण जास्त असते. ब्रोकोलीपासून तुम्ही सॅलड, भाजी किंवा सूप बनवू शकता. केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात ब्रोकोलीचे सेवन करावे.
लाईफ स्टाईल संबंधित बातमीसाठी इथे क्लिक करा
अनेकांना फरसबी खायला आवडत नाही. फरसबी पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण केसांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात फरसबीचे सेवन करावे. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळून येते, ज्याचा फायदा केसांना होतो. केसांच्या वाढीसाठी लोह आणि झिंक आवश्यक आहे. त्यामुळे आहारात फरसबीचे सेवन करावे.