फोटो सौजन्य - Social Media
हिवाळा सुरु झाला आहे. वातावरणातील बदलांमुळे याचा परिणाम बहुतेक जणांच्या आरोग्यावर दिसून येणार आहे. आरोग्यावरील हा परिणाम बहुतांश रित्या सर्दी किंवा खोकल्याच्या रूपात असतो. अशा वेळी आवाज बसने फार सामान्य असते. कधी काळी व्यक्तीचा आवाज इतका बसून जातो कि तो काढणेही कठीण होऊन जाते. काही वेळा तर या बसलेल्या आवाजामुळे घशामध्ये एक वेगळेच दुखणे होत असते. जर तुम्हालाही आवाज बसण्याचा त्रास होत आहे तर मुळीच टेन्शन घेऊ नका. आमच्याकडे यावर उपाय आहे. या उपायाने तुम्ही तुमच्या आवाजाला पाहिल्यासारखे नक्की करू शकता. तसेच दुखणेही बऱ्यापैकी थांबून जाईल.
आवाज बसणे म्हणजे काय?
आवाज बसणे म्हणजे घसा बसणे याला वैद्यकीय भाषेमध्ये लॅरिन्जाइटिस असे म्हणतात. गळ्यातील व्हॉइस बॉक्समध्ये सुजन आल्याने ही परिस्थिती उद्भवते. मुळात व्हॉइस बॉक्समुळे आवाज येत असतो. त्यामध्ये असणारे व्हायब्रेशन आवाज बाहेर पडण्यास कारणीभूत असतो. व्हॉइस बॉक्सच्या आत व्होकल कोड असतात. हे नियमित खुले बंद होत असतात. हवा आत येण्यास आणि बाहेर जाण्यास हे कारणीभूत असतात. मुळात, यांच्या एकत्र प्रक्रियेमुळे आवाज येत असतो. परंतु, जेव्हा व्हॉइस बॉक्स सुजतो तेव्हा आवाज निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. कधी कधी तर आवाज जाण्याची देखील शक्यता असते.
आवाज जाण्याच्या अगोदर कोणते लक्षणे नजरेत येतात?
आवाज जाणे वेदनादायक असू शकते. आवाज हरवणे म्हणजे शरीरात काहीतरी गडबड आहे, असे संकेत होऊ शकतात. सामान्यतः व्हायरल इन्फेक्शन, गंभीर फ्लू किंवा कोविड-19 मुळेही आवाज हरवू शकतो. एलर्जीमुळे वोकल कॉर्ड्समध्ये सूज येऊ शकते. यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या एलर्जीचे औषध, एंटीहिस्टामाइन, गळ्याला कोरडे करू शकते, ज्यामुळे आवाज गडद होऊ शकतो. आवाज हरवणे सामान्यतः गंभीर आजारामुळे होऊ शकते, पण कधी कधी दुखापतीमुळेही हे होऊ शकते.
जाणून घ्या उपाय:
अशा वेळेमध्ये आवाजाला जितका आराम देता येईल तितका द्या. जास्त बोलणे टाळा. तसेच मोठ्या आवाजात बोलणे टाळा. आवाजाला आरामाची गरज असते, त्यामुळे शक्य तितके कमी बोला. आपल्या घशाला ओलावा असुद्या. घशामध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे. शक्य तितके पाणी प्या. थंड पाणी पिऊ नका. अशा परिथितीमध्ये धूम्रपान टाळा. धूम्रपान केल्याने किंवा त्याच्या धुराने आपली परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. कोणतेही औषधे घेण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.