Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात सुन्नपणा आणि रक्तदाबामध्ये बदल! पुण्यात दुर्मिळ आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

पुण्यात दुर्मिळ आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. जाणून घेऊया लक्षणे आणि उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 22, 2025 | 09:58 AM
पुण्यात दुर्मिळ आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ! जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

पुण्यात दुर्मिळ आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ! जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Follow Us
Follow Us:

जगभरात कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. पाच वर्षांआधी जगभरात सगळीकडे पसरलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यस्था कोलमडून गेली होती. कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेक रुग्णांनाच मृत्यू देखील झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात नव्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्याने पसरलेल्या विषाणूचे नाव गुइलेन-बॅरे सिंड्रोम असे आहे. या आजाराचे पुण्यात 22 रुग्ण आढळून आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांचे नमुने आयसीएमआर-एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. याशिवाय या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यातील सिंहगड परिसरात सापडले आहेत.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार असून यामध्ये अचानक शरीरात सुन्नपणा जाणवणे, स्नायू कमकुवत होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. तसेच हा आजार झालेल्या रुग्णांना कमकुवतपणा जाणवू लागला आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 22 वर पोहचली असून बहुतेक रुग्ण 12 ते 30 वयोगटातील आहेत. याशिवाय 59 वर्षीय रुग्णाला सुद्धा नव्या सिंड्रोमची लागण झाली आहे.

guillain barre syndrome म्हणजे काय?

गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक गंभीर आजार आहे. याशिवाय हा आजार मज्जासंस्थेशी संबंधित असून रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. ज्यामुळे हात पाय सुन्न होणे, हातापायांची हालचाल थांबणे, स्नायू कमकुवत होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. हा आजार झालेल्या रुग्णांची स्थिती अतिशय गंभीर असून त्यांना चालणे किंवा श्वास घेण्यास अनेक अडचणी येत आहेत.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे?

  • अचानक शरीरात सुन्नपणा जाणवणे
  • डोळे आणि स्नायूंमध्ये अडचण
  • बोलण्यात, चघळण्यात किंवा गिळण्यात समस्या
  • सुई टोचल्यासारख्या वेदना होणे
  • समन्वयाची समस्या, चालण्यात अस्थिरता
  • हृदयाची गती किंवा रक्तदाब मध्ये बदल
  • पचन किंवा मूत्राशय नियंत्रणात समस्या
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

गुइलेन-बॅरे सिंड्रोम कशामुळे उद्भवतो:

गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा गंभीर सिंड्रोम व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर उद्भवण्याची शक्यता असते. ज्यावेळी शरीर संसर्गाशी लढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चुकून शरीराच्या नसांवर परिणाम होऊन हा आजार होण्याची शक्यता असते. ज्यामुळे शरीरात सतत अशक्तपणा आणि कमकुवतपणा जाणवू लागतो. त्यामुळे या आजाराची शरीरात लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.गुइलेन-बॅरे सिंड्रोम वेळेवर उपचार घेतल्यानंतर पूर्णपणे बरा होऊ शकतो. सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णाची योग्य काळजी घेतल्यास रुग्ण हळूहळू त्याचे सामान्य जीवन जगू शकतो.

Web Title: Increase in the number of rare disease patients in pune guillain barre syndrome symtoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • Guillain Barre syndrome
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
1

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
2

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
3

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
4

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.