पेनिकलरच्या गोळ्या खाल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:
धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेकदा वेळ मिळत नाही. हिवाळ्यात किंवा इतर वेळी साथीच्या आजारांमुळे आरोग्य बिघडून जाते. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेण्याऐवजी मेडिकलमध्ये जाणून सर्दी, ताप किंवा इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्या जातात. पण सतत पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. आजकाल बरेच लोक कंबरदुखी किंवा हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी पेनिकलरच्या गोळ्या खातात. पण पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे किडनीवर आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
नेहमी नेहमी छोट्या मोठ्या दुखण्यावर पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत पेनकिलरच्या गोळ्या न खाता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सतत पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे आरोग्यावर नेमके काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सतत पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय गॅस आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इत्यादी गंभीर विकार होण्याची शक्यता असते. तसेच अतिसार, जठराची सूज, मळमळ आणि उलट्या इत्यादी समस्या वाढू शकतात. डोकेदुखी. चक्कर सुद्धा येऊ शकते. पेनकिलरच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराचा रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करावे.
अतिप्रमाणात पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर शरीरात इतर आजारही वाढतात. त्यामुळे पेनकिलरच्या गोळ्या खाऊ नये. तसेच नेहमी नेहमी पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो, शरीरात पाणी आणि सोडियम टिकून राहते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
शरीरात वाढलेल्या वेदना किंवा आजार कमी करण्यासाठी पेनकिलरच्या गोळ्या खाल्या जातात. मात्र सतत या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे यकृताचे आरोग्य बिघडून जाते. यकृतामधील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्याऐवजी तसेच शरीरामध्ये साचून राहतात. ज्यामुळे आरोग्य बिघडते. शरीरात विषारी पदार्थ तसेच साचून राहिल्यामुळे यकृताचे आरोग्य बिघडून जाते.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात विषारी घाण साचून राहिल्यानंतर आतड्यांचे आरोग्य बिघडू लागते. त्यामुळे पेनकिलरच्या गोळ्या खाऊ नये. पेनकिलरच्या गोळ्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास द्धकोष्ठता, सूज येणे, पोट फुगणे आणि मूळव्याध इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच पेनकिलरच्या गोळ्या पचवणे आरोग्यसाठी अतिशय कठीण आहे.