
लिव्हरमध्ये वाढलेल्या चरबीमुळे उद्भवेल कॅन्सरचा धोका! डॉक्टर सौरभ सेठीने सांगितलेल्या 'या' पदार्थांचे करा नियमित सेवन
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. याशिवाय खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी लिव्हर महत्वपूर्ण भूमिका बजावते.पण धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे सेवन, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. असंतुलित आहारामुळे फॅटी लिव्हरची समस्या वाढू लागली आहे. यासोबतच यकृतदाह, फायब्रोसिस, कॅन्सर किंवा सिरॉसिस इत्यादी गंभीर आजारांची शरीराला लागण होते. लिव्हरसबंधित आजारांना ‘सायलेंट डिसीज’ असे म्हणतात.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हरच्या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर लवकर लक्षणे दिसून येत नाहीत. लिव्हरमध्ये वाढलेली अनावश्यक चरबी फॅटी लिव्हर आणि लिव्हर कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हरच्या आजारांची शरीराला लागण होऊ नये, म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल डॉक्टर सौरभ सेठी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच चहा पिण्याची सवय असते. चहाचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. पण वारंवार चहाच्या सेवनामुळे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी चे सेवन करावे. ग्रीन टी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकते आणि शरीर डिटॉक्स करते. यामध्ये कॅटेचिन्स आढळून येते, ज्यामुळे यकृतातील एन्झाइम्स सुधारतात आणि चरबीची साठवण कमी होऊन जाते. लिव्हरमधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधरण्यासाठी नियमित ग्रीन टी चे सेवन करावे. साखरेचा वापर न करता बनवलेला चहा शरीरासाठी प्रभावी ठरेल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीच्या सेवनामुळे फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो. तसेच कॉफी बनवताना त्यात मध, स्टेव्हिया किंवा मॉन्क फ्रूटसारखे नैसर्गिक स्वीटनर वापरावेत. यामुळे लिव्हरमधील फायब्रोसिस कमी होऊन जातात. शरीरातील दाह कमी करण्यासाठी कॉफी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. पण कॉफीचे अतिसेवन करणे टाळावे.
सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास बीटचा रस प्यायल्यास लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडून जाते. यामध्ये असलेले बेटालेन्स हे अँटिऑक्सिडंट्स लिव्हरचे हानिकारक पेशींपासून बचाव करते. शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया वाढवण्यासाठी बीटचा रस प्यावा. बीटचा रस प्यायल्यामुळे लिव्हरमधील अनावश्यक चरबी कमी होते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
यकृत खराब होणे म्हणजे काय?
यकृत खराब होणे म्हणजे यकृत त्याच्या आवश्यक कार्यांसाठी पुरेसे काम करू शकत नाही. ही स्थिती वेगाने किंवा हळूहळू होऊ शकते. यकृताच्या नुकसानीमुळे डाग (सिरोसिस) पडतात, ज्यामुळे यकृत निकामी होऊ शकते.
यकृत खराब होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत?
यकृत खराब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये जीवनशैलीशी संबंधित सवयी, संक्रमण आणि अनुवांशिक विकार यांचा समावेश आहे.
यकृत खराब झाल्याची सामान्य लक्षणे कोणती?
सुरुवातीच्या टप्प्यात यकृत खराब होण्याची लक्षणे दिसत नाहीत. पण जसजसा रोग वाढत जातो, तसतशी ही लक्षणे दिसू लागतात.