फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदातील प्रभावी उपाय
निरोगी आरोग्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव निरोगी असणे आवश्यक आहे.शरीरातील एखाद्या अवयवाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे जीवन जगताना आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागली आहे. फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र तरीसुद्धा आराम मिळत नाही. लिव्हरच्या पेशींमध्ये जास्त प्रमाणात चरबी तयार होण्यास सुरुवात झाल्यानंतर फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागते. तसेच मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवते.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे अनेकदा फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागते. तसेच मद्यपान न करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा फॅटी लिव्हरची समस्या आढळून येते. लिव्हरला सूज येणे, वजन अचानक कमी होणे, भूक न लागणे, सतत थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. अन्यथा लिव्हर खराब होण्याची शक्यता असते. मात्र आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदातील काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.
फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचा वापर करावा. हळदीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. लिव्हरच्या आरोग्यासाठी हळद फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे लिव्हरचे नुकसान होत नाही. तसेच लिव्हरमधील जळजळ कमी होऊन आराम मिळतो. यासाठी कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून पाण्याचे सेवन करा.
त्रिफळा चूर्णचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे लिव्हरचे नुकसान होत नाही. लिव्हरला आलेली सूज कमी होऊन आराम मिळतो. लिव्हरमध्ये जळजळ होत असल्यास त्रिफळा चूर्णाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आवळ्यामध्ये विटामिन सी आणि ए आढळून येते, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात आवळ्याच्या पावडरचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळ्वण्यासाठी आवळ्याच्या पावडरचा वापर करा. यामुळे लिव्हरचे नुकसान होत नाही आणि शरीराला अनेक फायदे होतात.