(फोटो सौजन्य: istock)
आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या बहुतेक गरजेच्या गोष्टींमधीलच एक म्हणजे चहाचं भांड. अनेकांच्या सकाळची सुरुवात गरमा गरम चहाने होत असते, चहा पित नाहीत तोपर्यंत त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. आता बऱ्याचदा गॅसवर चहा ठेवून आपण विसरून जातो, परिणामी चहा आटून, भांड्यावर कळा थर बसतो जो घासूनही निघता निघत नाही. हा प्रकार आपल्यासोबत कधी या कधी नक्कीच झाला असावा. अनेक दिवस घासूनही भांड्यावरचा हा काळा थर जाता जात नाही अशात आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत ज्यांच्या मदतीने कोणतीही मेहनत न घेता आपण जळलेले चहाचे भांडे साफ करू शकतो. चहाच्या भांड्यावरचा काळा थर काढण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपली मदत करतील ते जाणून घेऊया.
बेकिंग सोडा आणि लिंबू
जळलेले चहाचे भांडे क्लीन करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि चेकिंग सोड्याची मदत घेऊ शकता. यासाठी जळलेल्या भांड्यात पाणी, लिंबाचा रस आणि १ चमचा बेकिंग सोडा एकत्र मिसळून ते ५-१० मिनिटे गॅसवर गरम करून घ्या. पाणी थंड होऊ द्या आणि नंतर जळलेला भाग स्वच्छ करण्यासाठी स्क्रबरचा वापर करा.
तुम्हाला जाणवेल की भांड्यांवरचा काळा थर कोणतीही एक्स्ट्रा मेहनत न घेता वेगळा होत आहे.
मीठ आणि व्हिनेगर
आपले जळलेले चहाचे भांडे साफ करण्यासाठी तुम्ही मीठ आणि व्हिनेगरचीही मदत घेऊ शकता. यासाठी भांड्यावर आधी मीठ लावा आणि नंतर त्यावर व्हिनेगर ओता. या प्रक्रियेमुळे जळलेल्या खुणा सहज निघून जातील. भांड्याला १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्क्रबरच्या मदतीने जळलेला भाग घासून स्वछ करा.
लिंबू
जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर भांडी स्वछ करण्यासाठीही लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी लिंबाच्या सालीला जळलेल्या जागी घासून काढा. यासाठी प्रथम भांड्यांचा साबण अथवा डिशवॉशिंग लिक्विड भांड्यावर लावा, यावर गरम पाणी ओता आणि मग लिंबाचा सालीने भांड्याला स्वछ करा. असं केल्याने भांड्यावरचा काळा थर सहज दूर होईल.
बटाट्याचे साल
अनेकांना हे ठाऊक नाही पण बटाट्याची साल देखील जळलेल्या भांड्यांवरील काळा थर काढून टाकण्यास बरीच मदत करत असतो. यासाठी जळलेल्या भांड्यात बटाट्याच्या साली, पाणी टाकून गॅसवर गरम करा आणि मग स्क्रबरच्या मदतीने याला घासून स्वछ करा. ॲल्युमिनियमची भांडी यामुळे पूर्णपणे स्वछ होतील.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा एक नॅचरल क्लींजरप्रमाणे काम करते. तुम्ही भांड्यात बेकिंग सोडा, डिशवॉशिंग लिक्विड आणि पाणी एकत्र करून गॅसवर गरम करू शकता. पाणी उकळलं की गॅस बंद करा आणि पाणी थंड होताच स्क्रबरने भांडी क्लिन करा. तुम्हाला जाणवेल की, काही क्षणातच भांड्याला नव्यासारखी चकाकी मिळली आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






