चेहऱ्यावरील पिंपल्स आणि व्रण कायमचे होतील गायब! जायफळ जेष्ठमधापासून घरीच तयार करा डार्कस्पॉट रिमूव्हल क्रीम
बऱ्याचदा चेहऱ्यावर सतत पिंपल्स आणि मुरुमांचे बारीक बारीक फोड येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स लवकर कमी होत नाहीत. आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक तणाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर आलेले डाग आणि पिंपल्स त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरुमांचे डाग किंवा फोड कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्ट आणि स्किन ट्रीटमेंट करून घेतात. पण सतत केलेल्या स्किन ट्रीटमेंट त्वचेसाठी हानिकारक ठरण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी कायमच स्किन ग्लोइंग क्रीम किंवा इतर वेगवेगळ्या लोशनचा वापर केला जातो. पण सतत केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेवरील डाग कमी करावेत.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे काळे डाग घालवण्यासाठी सतत केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो कायमच टिकून राहतो. त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग कमी होऊन जातात. डाग घालवण्यासाठी कायमच महागडे उपाय करण्याऐवजी स्वयंपाक घरातील वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि ग्लोइंग वाटते. स्वयंपाक घरात वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसाच वापर तुम्ही त्वचेसाठी सुद्धा करू शकता.
जायफळाचा वापर केल्यामुळे त्वचेवर आलेले काळे डाग कायमचे नष्ट होतात आणि त्वचा आतून स्वच्छ होते. जायफळमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेचा रंग उजळदार करतात. याशिवाय यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कमी करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जायफळचा वापर करून क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे त्वचा उजळदार होते.
क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, सहाणेवर गुलाब पाणी घालून त्यावर जायफळ उघळून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या जायफळच्या मिश्रणात ज्येष्ठमध पावडर, एलोवेरा जेल, बदाम तेल आणि विटामिन ‘ई’ कॅप्सूल मिक्स करून घ्या. तयार केलेली क्रीम व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काचेच्या डब्यात भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी नियमित तयार केलेली क्रीम डाग आलेल्या ठिकाणी लावून घ्या. जायफळ क्रीम लावल्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग नष्ट होतात आणि त्वचा खूप जास्त उजळदार होते.






