Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2025 : आतापर्यंत 6 वेळा बदलण्यात आलाय देशाचा राष्ट्रीय ध्वज; भारताला कसा मिळाला तिरंगा? जाणून घ्या इतिहास

१५ ऑगस्ट रोजी, आता सर्वांच्याच हातात तिरंगा झळकताना दिसेल. पण तुम्हाला माहिती आहे का? गर्वाने फडकावल्या जाणारे तिरंगाचे स्वरूप एकूण ६ वेळा बदलण्यात आले आहे. अखेर कसा होता याचा प्रवास? चला जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2025 | 08:15 PM
Independence Day 2025 : आतापर्यंत 6 वेळा बदलण्यात आलाय भारताचा राष्ट्रीय ध्वज; भारताला कसा मिळाला तिरंगा? जाणून घ्या इतिहास

Independence Day 2025 : आतापर्यंत 6 वेळा बदलण्यात आलाय भारताचा राष्ट्रीय ध्वज; भारताला कसा मिळाला तिरंगा? जाणून घ्या इतिहास

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा राष्ट्रध्वज हा केवळ तीन रंगांचा कपड्याचा तुकडा नाही, तर तो आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा, बलिदानाचा आणि अखंड ऐक्याचा जिवंत साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारत एक गुलाम देश असताना, राष्ट्रीय ध्वज ही केवळ ओळख नव्हती, तर ती स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा होती. या ध्वजासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास भोगला, छळ सहन केला आणि प्राणांचे बलिदान दिले. आज जेव्हा आपण तिरंगा हातात घेतो, तेव्हा त्यामध्ये फक्त रंग आणि चिन्हे दिसत नाहीत, तर त्याच्या प्रत्येक धाग्यात आपल्या पूर्वजांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि देशप्रेम दडलेले असते. आपल्या राष्ट्रध्वजाचा प्रवास अनेक टप्प्यांतून, अनेक आवृत्त्यांतून झाला आणि अखेर २२ जुलै १९४७ रोजी त्याला आजचे अंतिम स्वरूप मिळाले. चला, या प्रवासाचा टप्प्याटप्प्याने आढावा घेऊया.

15 ऑगस्टची मजा करा द्विगुणित; घरी बनवा गोडसर, तोंडात टाकताच विरघळणारी शेव बर्फी

1. पहिला राष्ट्रध्वज (1906)

  • 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्ता (पारसी बागान चौक) येथे पहिला राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला.
  • हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन आडव्या पट्ट्यांमध्ये विविध प्रतीके होती.

2. दुसरी आवृत्ती (1907)

  • मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे दुसरा ध्वज सादर केला.
  • पहिल्या ध्वजासारखाच होता पण थोडे प्रतीकात्मक बदल होते.

3. तिसरी आवृत्ती (1917)

  • होम रूल आंदोलनाच्या काळात अॅनी बेझंट व बाळ गंगाधर टिळक यांनी आणला.
  • लाल व हिरव्या पट्ट्या, युनियन जॅक आणि तारे असलेला ध्वज.

4. चौथी आवृत्ती (1921)

  • महात्मा गांधी यांनी 1921 मध्ये विजयवाडा अधिवेशनात नवीन ध्वजाचा प्रस्ताव मांडला.
  • त्यात पांढरा, हिरवा आणि लाल असे तीन रंग होते आणि मध्ये चरखा होता.
  • लाल रंग हिंदू, हिरवा मुस्लिम आणि पांढरा इतर धर्मांचे प्रतीक होता.

(फोटो सौजन्य: Telegraph India )

5. चरख्याचा ध्वज (1931)

  • 1931 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीने चरख्याचा असलेला केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन पट्ट्यांचा ध्वज स्वीकारला.
  • हा आधुनिक राष्ट्रध्वजाचा थेट पूर्वज मानला जातो.

6. अंतिम स्वरूप (1947)

  • 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने सध्याचा राष्ट्रध्वज अधिकृतपणे स्वीकारला.
  • ध्वजात तीन आडवे रंग – वर केशरी (शौर्य व बलिदान), मध्ये पांढरा (सत्य व शांतता), खाली हिरवा (शेती व समृद्धी).
  • मध्यभागी निळ्या रंगातील 24 आरे असलेले अशोक चक्र (न्याय व धर्मचक्र) आहे.
  • अशोक चक्र हे सारनाथ येथील सिंहस्तंभावरून प्रेरित आहे.

August Kranti Diwas: स्वातंत्र्याची शेवटची लढाई कशी झाली? ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवणाऱ्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचे खरे चित्र

7. नियम व आदर

  • राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी “भारतीय ध्वज संहिता” लागू आहे.
  • कोणत्याही प्रसंगी ध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाते.

भारताचा राष्ट्रध्वज हा स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान, विविधतेतील ऐक्य आणि देशाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. त्याचा प्रवास आपल्याला स्मरण करून देतो की, प्रत्येक पट्टी आणि चक्रामागे आपल्या पूर्वजांची जिद्द आणि संघर्ष दडलेला आहे.

Web Title: Independence day 2025 indias national flag has been changed 6 times know the history of tiranga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • History
  • Independence Day
  • new information

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

जगातील ५ सर्वात धोकादायक ठिकाणं जिथून परतणे जवळजवळ अशक्य… भारतातील या जागेचाही आहे समावेश
2

जगातील ५ सर्वात धोकादायक ठिकाणं जिथून परतणे जवळजवळ अशक्य… भारतातील या जागेचाही आहे समावेश

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
3

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
4

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.