
Raigad News: जनतेसाठीचा भीमाशंकर महामार्ग २५ वर्षे रखडला, मग टोरंटसाठी झाडे तोडण्याची परवानगी कशी? उदय पाटलांचा सवाल
पुणे जिल्हा मुंबईच्या आणखी जवळ यावा यासाठी पनवेल नेरळ कशेळे भीमाशंकर मंचर असा घाटरस्ता शासनाच्या १९८०चे रस्ते विकास आराखड्यात मंजूर आहे. भीमाशंकर घाटातून जाणाऱ्या या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी २००९ साली केले होते. या रस्त्यामुळे मुंबई ते शिरूर हे अंतर साठ किलोमीटर ने कमी होईल असे सांगितले गेले. वेळेची बचत, इंधनाची बचत, पर्यायाने प्रदूषण कमी होणारा हा रस्ता सर्वांसाठीच खूप गरजेचा होता.
हा रस्ता साडे चार किलोमीटर वन खात्याच्या जमिनीतून जात होता. त्याकरिता सर्वजनिक बांधकाम विभागाने वन खात्याला कोलाड येथे जमीन खरेदी करून दिली. त्याच सोबत त्या जागेला कुंपण करणे, झाडे लावणे आणि जगवणे याचा संपूर्ण खर्च दिला. तरी देखील त्यांच्या अनेक जाचक अटींची पूर्तता करण्यात सर्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वर्ष लागत आहेत, बांधकाम खात्याने येथील रस्ता बनवण्यासाठी निधी मंजूर केला रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली पण नंतर वन विभागाने घाटातील रस्ते कामाला परवानगी नाकारली, तेव्हापासून बांधकाम विभाग वन विभागाच्या नागपूर भोपाळ येथे फेऱ्या मारत असून वन विभागाने परवानगी नाकारली आहे.
याच जंगलात शेखरू नावाचा दुर्मिळ प्राणी आढळल्याने पुन्हा निर्बंध आले. एकूणच नागरीकांच्या गरजेचा आणि इंधनाच्या माध्यमातून शासनाचे हजारो करोड रुपये वाचवणारा हा महामार्ग अजूनही होऊ शकला नाही. या भागाचे खासदार श्रीरंग बारणे आणि ज्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले ते सुनील तटकरे आता खासदार आहेत.
Nanded News : – नांदेडमध्ये वाडी रुग्णालयाचे लोकार्पण; शेतकऱ्यांना मदतीचे वाटप…
जो रस्ता २५ वर्षे वनविभागाने अडवला आहे. त्याच्या फक्त दोन चार किलोमीटर पुढे याच पाली सायडोंगर आहे. याच डोंगर रांगेत असलेल्या जंगलात शेकडो एकर वरील लाखो झाडे तोडायला एक महिन्यात परवानगी मिळून वनखत्याच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने शेकडो झाडांची कत्तल झाली आहे. एका खाजगी उद्योजकाला लाखभर झाडे तोडायला वनविभाग तातडीने परवानगी देतो, आणि शासकीय रस्ता पंचवीस वर्ष अडवला जातो, पण जनतेला नको असलेला प्रकल्प सरकार लादत असून सरकारचा या धोरणाचा कर्जत तालुका विरोध करीत असल्याचे उदय पाटील यांनी स्पष्ट केले.