Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: शेतीत नुकसान, खिशात पैसा नाही; दिवाळी कशी साजरी करायची? शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 02, 2026 | 02:50 PM
Chandrapur News: शेतीत नुकसान, खिशात पैसा नाही; दिवाळी कशी साजरी करायची? शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Chandrapur News: शेतीत नुकसान, खिशात पैसा नाही; दिवाळी कशी साजरी करायची? शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Follow Us
Follow Us:
  • पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही
  • दिवाळी साजरी करायची कशी, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांसमोर
  • दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता शासनाने चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला
धाबा: यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र, अद्याप दुष्काळी नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच शासनाने जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे दिवाळी साजरी करायची कशी, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांसमोर उभा ठाकला असून शासनाच्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Raigad News: जनतेसाठीचा भीमाशंकर महामार्ग २५ वर्षे रखडला, मग टोरंटसाठी झाडे तोडण्याची परवानगी कशी? उदय पाटलांचा सवाल

यंदा पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका खरीप हंगामाला बसला. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घ खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली. जमिनीतील ओलावा कमी झाला आणि हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाळून गेली. बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता मावळली. परिणामी, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता शासनाने चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुष्काळ जाहीर होऊनही प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा कायम आहे. नुकसानभरपाईची रक्कम कधी मिळणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या मदतीतून किमान सणाचा खर्च भागवता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळी जवळ आली तरी ही रक्कम खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे घोषणेचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिवाळी म्हटले की घरातील मुलांचे कपडे, फराळाचे साहित्य, किराणा आणि इतर खर्च आलेच. मात्र, शेतीतून उत्पन्नच मिळाले नसल्याने या खर्चाची तरतूद करणेही शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. एका बाजूला शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची चिंता, तर दुसऱ्या बाजूला सण साजरा करण्याचे आव्हान, अशा दुहेरी संकटात शेतकरी कुटुंबे सापडली आहेत.

शेतकऱ्यांना आता आश्वासन नको, तर प्रत्यक्ष मदत हवी आहे. जाहीर केलेले पाच हजार रुपये तातडीने खात्यात जमा करावेत आणि दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी.- विनोद दुर्गे, शेतकरी, खराळपेठ

Shivaji Park : ‘जब दीप जले आना’च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान

केवळ घोषणा नको, मदत प्रत्यक्ष खात्यात जमा करा!

संकटाच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मदतीच्या घोषणा होऊनही प्रत्यक्ष लाभ मिळत नसेल, तर त्याचा उपयोग काय, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. दिवाळीपूर्वी जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे अनुदान तातडीने वितरित करावे आणि दुष्काळी नुकसानभरपाईही विलंब न करता द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Drought hit farmers await compensation and 5000 rupees aid as diwali approaches hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ
1

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प
2

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान
3

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
4

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.