WTC 2025-27 Points Table
ढाका येथे झालेल्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने बांग्लादेशला आठ विकेट्सने पराभूत केले. सिल्हेट येथे झालेली दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यासोबतच कॅरिबियन संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ चे चक्रही पूर्ण केले.परंतु, या मालिकेमुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत काही फेरबदल झाले आहेत. बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे, तर भारताला निश्चितच फायदा झाला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातील बांग्लादेशच्या पराभवाचा भारताला मोठा फायदा झाला. टीम इंडियाने डब्ल्यूटीसी गुणतालिकेत मोठी उडी घेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली. यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा अधिकच बळकट झाल्या. यापूर्वी बांग्लादेश चौथ्या क्रमांकावर होता. गेल्या काही महिन्यांपासून संघाची कामगिरी दमदार होती. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभवानंतर गुणातालिकेत मोठा बदल झाला.
सिल्हेट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, गुणतालिकेत बांग्लादेशचे ४७.६२ गुण होते. वेस्ट इंडिज २६.९२ गुणांसह आठव्या क्रमांकावर होता. दुसऱ्या कसोटीतील विजयाचा बांग्लादेशला फायदा झाला असता. सामना अनिर्णित राहिल्याने, बांग्लादेशच्या टक्केवारीत आणखी घट झाली आहे. यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
आता, बांग्लादेशची टक्केवारी ४५.८३ पर्यंत घसरली आहे, तर वेस्ट इंडिजची टक्केवारी २७.३८ वर पोहोचली आहे. भारत ५१.५२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता, बांगलादेश आणि टीम इंडियात मोठे अंतर निर्माण झाले आहे. याचा फायदा भारताला झाला आहे. न्यूझीलंड ७२.२२ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.






