Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुर्मिळ पल्‍मनरी हायपरटेंशनने पीडित तान्‍ह्या मुलीवर फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे यशस्‍वी उपचार

पुण्‍याची निवासी असलेल्‍या दिशाचे दोन वर्षांपूर्वी इडिओपॅथिक पल्‍मनरी हायपरटेंशनसह निदान झाले होते. तिला सिंकोप व थकव्‍याचा त्रास होत होता. पल्‍मनरी हायपरटेंशनमुळे तिच्‍या फुफ्फुसामधील दबाव वाढत होता, पण हृदयामध्‍ये कोणतेही रचनात्‍मक दोष आढळून आले नाहीत, अन्‍यथा फुफ्फुसामधील दबाव अधिक वाढला असता. म्‍हणून या स्थितीला 'इंडिओपॅथिक' म्‍हणजेच 'अज्ञात कारण' असे लेबल देण्‍यात आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 29, 2024 | 02:49 PM
इडिओपॅथिक पल्‍मनरी हायपरटेंशन साठी यशस्‍वीपणे उपचार

इडिओपॅथिक पल्‍मनरी हायपरटेंशन साठी यशस्‍वीपणे उपचार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: जवळपास दोन वर्ष श्‍वास घेण्‍यास त्रास सहन केल्‍यानंतर चार वर्षीय मुलगी दिशा सहायने इडिओपॅथिक पल्‍मनरी हायपरटेंशन साठी यशस्‍वीपणे उपचार घेतल्‍यानंतर अखेर मोकळा श्‍वास घेतला. या आजारामुळे तिला उच्‍च रक्‍तदाबाचा त्रास होतो, ज्‍यामुळे फुफ्फुसामध्‍ये दबाव वाढला होता. ‘पॉट्स शण्‍ट’ म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या प्रक्रियेच्‍या मदतीने तिच्‍यावर उपचार करण्‍यात आले. फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील पेडिएट्रिक कार्डियक सायन्‍सेसच्‍या संचालक डॉ. स्‍नेहल कुलकर्णी यांच्‍या टीमने ही प्रक्रिया पार पाडली.(फोटो सौजन्य-istock)

पुण्‍याची निवासी असलेल्‍या दिशाचे दोन वर्षांपूर्वी इडिओपॅथिक पल्‍मनरी हायपरटेंशनसह निदान झाले होते. तिला सिंकोप व थकव्‍याचा त्रास होत होता. पल्‍मनरी हायपरटेंशनमुळे तिच्‍या फुफ्फुसामधील दबाव वाढत होता, पण हृदयामध्‍ये कोणतेही रचनात्‍मक दोष आढळून आले नाहीत, अन्‍यथा फुफ्फुसामधील दबाव अधिक वाढला असता. म्‍हणून या स्थितीला ‘इंडिओपॅथिक’ म्‍हणजेच ‘अज्ञात कारण’ असे लेबल देण्‍यात आले. पण, सामान्‍यत: जन्‍मजात हृदय दोषांमुळे पल्‍मनरी हायपरटेंशन आजार होतो, ज्‍यामुळे रक्‍तप्रवाह वाढतो आणि फुफ्फुसामधील रक्‍तवाहिन्‍यांची भित्तिका जाडी वाढते किंवा हृदयामधील दबाव वाढून हार्ट व्‍हॉल्‍व्‍ह्जमधून रक्‍तस्‍त्राव किंवा ब्‍लॉकेज होऊ शकते किंवा फुफ्फुसातील रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये अडथळा येऊ शकतो, जसे रक्‍ताच्‍या गाठी होणे.

हे देखील वाचा: किवी खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते का?

अशा स्थितीमुळे मुलीला खेळल्‍यानंतर थकवा जाणवत होता, ज्‍यामुळे शाळेमध्‍ये खेळणे किंवा दैनंदिन क्रियाकलाप करणे देखील अवघड झाले होते. असे क्रियाकलाप केल्‍याने तिच्‍या फुफ्फुसामध्‍ये दबाव वाढत जातो, ज्‍यामुळे उजव्‍या वेंट्रिकलवर अधिक ताण येऊन चक्‍कर येणे व डोळ्यासमोर अंधार येणे असे त्रास होत होते.

डॉक्‍टरांनी औषधोपचार करत दबावावर नियंत्रण ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला, पण तिच्‍यामधील लक्षणे कायम राहिली आणि फुफ्फुसावरील दबाव उच्‍च राहिला. अधिक विलंब केल्‍यास स्थिती गंभीर होण्‍यासोबत तिच्‍या जीवनाला धोका निर्माण होऊ शकला असता, म्‍हणून पॉट्स शण्‍टची शिफारस करण्‍यात आली. या प्रक्रियेमध्‍ये फुफ्फुस आणि शरीरामधील दाब समान करण्‍यासाठी डाव्‍या बाजूची पल्‍मनरी आर्टरी आणि शरीराच्‍या खालील भागांकडे जाणारी थेरॅसिस ऑर्टा यांच्‍यामध्‍ये ट्यूब जोडण्‍यात आली.

या प्रक्रियेबाबत सांगताना फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील पेडिएट्रिक कार्डियक सायन्‍सेसच्‍या संचालक डॉ. स्‍नेहल कुलकर्णी म्‍हणाल्‍या, या मुलीच्‍या छातीच्‍या डाव्‍या बाजूकडे ही प्रक्रिया करण्‍यात आली. डाव्‍या बाजूकडील पल्‍मनरी आर्टरी आकाराने मोठी होती आणि उच्‍च दबावामुळे आकार अधिक वाढला होता. शरीराच्‍या खालील भागांकडे जाणाऱ्या थोरॅसिस ऑर्टाचे (मणक्‍याच्‍या मध्‍यभागी असलेली धमनी) विच्‍छेदन करण्‍यात आले. ट्यूबचे एक टोक डाव्‍या बाजूच्‍या पल्‍मनरी आर्टरीला आणि दुसरे टोक आंशिक साइड-बायटिंग क्‍लॅम्‍प्‍सचा वापर केल्‍यानंतर ऑर्टाला जोडण्‍यात आले आणि छातीचा भाग बंद करण्‍यात आला. या मुलीने प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद दिला आणि प्रक्रिया यशस्‍वी ठरली.

हे देखील वाचा: तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचे आहे का? रोजच्या आहारात समाविष्ट करा हा पदार्थ

शस्‍त्रक्रियेनंतर केअर घेत एक आठवड्याने रूग्‍णाला डिस्‍चार्ज देण्‍यात आला. नुकतेच फॉलो-अपदरम्‍यान दिसून आले की मुलीला उत्तमप्रकारे भूक लागत आहे, वजन वाढले आहे आणि उत्तम लक्षणांसह आराम मिळत आहे. ती पुन्‍हा शाळेत जाऊ लागली आहे आणि पालकांच्‍या देखरेखीअंतर्गत इतर मुलांसोबत खेळायला देखील सुरूवात केली आहे.

Web Title: Infant girl suffering from rare pulmonary hypertension successfully treated at fortis hospital mulund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 02:47 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Heart Disease

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा मेथी दाण्यांच्या चहाचे सेवन, उच्च कोलेस्टरॉलने भरलेल्या नसा होईल मोकळ्या
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा मेथी दाण्यांच्या चहाचे सेवन, उच्च कोलेस्टरॉलने भरलेल्या नसा होईल मोकळ्या

जीवघेण्या कॅन्सरपासून राहा चार हात लांब! Stanford डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला होतील फायदे
2

जीवघेण्या कॅन्सरपासून राहा चार हात लांब! Stanford डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला होतील फायदे

अ‍ॅबॉटकडून नवीन- प्रगत एन्‍शुअर डायबिटीज केअर लाँच! रक्‍तातील साखरेचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास वैद्यकीयदृष्‍ट्या होणार मदत
3

अ‍ॅबॉटकडून नवीन- प्रगत एन्‍शुअर डायबिटीज केअर लाँच! रक्‍तातील साखरेचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास वैद्यकीयदृष्‍ट्या होणार मदत

आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते? पोट स्वच्छ करण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, बद्धकोष्ठता होईल दूर
4

आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते? पोट स्वच्छ करण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, बद्धकोष्ठता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.