
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक गाजर पचडी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. गोड चवीचे गाजर चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आणि पौष्टीक आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्यांसोबतच गाजर देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. यामध्ये बीटा-कॅरेटीन, जीवनसत्त्व ए, सी, के, बी६, पोटॅशियम आणि फायबर अनेक घटक आढळून येतात. गाजरचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांची कमजोर झालेली दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि डोळ्यांवरील चष्मा निघून जातो. गाजरमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स व जीवनसत्त्व सी शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करते. सकाळच्या नाश्त्यात गाजर बीटचा रस प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. नियमित गाजर खाल्ल्यास त्वचा अतिशय चमकदार होते आणि चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहतो. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गाजर पचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी
थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी