Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणानंतर सुपारी खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बीटरूट आवळ्याचा मुखवास, विटामिन सी ने समृद्ध पदार्थ

जेवणानंतर अनेकांना सुपारी किंवा बडीशेप खाण्याची सवय असते. पण त्याऐवजी बीट आणि आवळ्यापासून बनवलेला मुखवास खावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 02:18 PM
जेवणानंतर सुपारी खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बीटरूट आवळ्याचा मुखवास

जेवणानंतर सुपारी खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बीटरूट आवळ्याचा मुखवास

Follow Us
Follow Us:

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना बडीशेप किंवा मुखवास खाण्याची सवय असते. बडीशेप, मुखवास खाल्ल्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होते. तसेच बडीशेप खाल्ल्यामुळे तोंडाचा वास सुद्धा कमी होतो. तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या पदार्थाचे सेवन केले जाते. पण सतत हानिकारक घटक आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे मुखवास म्हणून सेवन करण्याऐवजी घरच्या घरी मुखवास तयार करा. मुखवास हा पदार्थ १ ते २ महिने व्यवस्थित टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आवळा बीटपासून मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जेवणानंतर बडीशेप केवळ चव म्हणून तरी पूर्वीच्या काळापासून आलेली चालत आलेली प्रथा आहे. बीट आणि आवळा चवीला काहीसा तुरट लागतो. त्यामुळे लहान मुलं बीट खाण्यास नकार देतात.अशावेळी मुलांना मुखवास खाण्यास द्यावा. हा पदार्थ लहान मुलांसह मोठेसुद्धा खाऊ शकता. मुखवास खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया आवळा बीटचा मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा ‘काकडीचा रायता’, 5 मिनिटांची रेसिपी नोट करा

साहित्य:

  • आवळा
  • बीटरूट
  • जिरं पावडर
  • चाट मसाला
  • काळे मीठ
  • आलं
  • काळीमिरी पावडर
  • साखर
फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकून मुलं नाक मुरडतात? मग झटपट बनवा Roasted Cauliflower, नोट करा रेसिपी

कृती:

  • आवळा बीटचा मुखवास बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळा आणि बीट किसणीच्या सहाय्याने बारीक किसून त्यातील पाणी काढून घ्या.
  • खलबत्यामध्ये भाजलेले जिरं, काळीमिरी, काळे मीठ, साखर, चाट मसाला घालून बारीक पावडर कुटून घ्या.
  • तयार केलेली पावडर बीट आणि आवळ्याच्या किसामध्ये टाकून थोडस बारीक किसलेलं आलं टाकून हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण ताटात पातळ पसरवून कडक उन्हात दोन ते तीन दिवस सुकवून घ्या.
  • तयार केलेला मुखवास काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यास दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकून राहील.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आवळा बीटचा मुखवास.
 

 

 

Web Title: Instead of eating betel nut after meal make beetroot amla mukhawas at home in an easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • amla benefits
  • Benefits of beetroot
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
3

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
4

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.