फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकून मुलं नाक मुरडतात? मग झटपट बनवा Roasted Cauliflower, नोट करा रेसिपी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना फ्लॉवरची भाजी खायला अजिबात आवडत नाही. फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलं नाक मुरडतात. तर काही घरांमध्ये फ्लॉवरची भाजी उगर्स वासामुळे आणली जात नाही. पण फ्लॉवर शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. शरीरात वाढलेल्या डिहायड्रेशनपासून आराम मिळवण्यासाठी फ्लॉवरच्या भाजीचे सेवन करावे. नेहमीच मसाल्यातील फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रोस्टेड फ्लॉवर बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल.रोस्टेड फ्लॉवर मुलं आवडीने खातील. हा पदार्थ तुम्ही स्नॅकस म्हणून सुद्धा बनवू शकता. रोस्टेड फ्लॉवर बनवण्यासाठी ओव्हनची आवश्यकता लागते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये रोस्टेड फ्लॉवर बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा ‘काकडीचा रायता’, 5 मिनिटांची रेसिपी नोट करा






