Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Natural Black Hair: तरूण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी हेअर डाय, कलर इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण त्याऐवजी आवळ्याच्या पावडरचा वापर केसांसाठी करावा. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस काळेभोर दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2026 | 03:00 PM
Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी 'या' पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी 'या' पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Follow Us
Follow Us:

Natural Black Hair: सर्वच महिलांना आपले केस कायमच चमकदार आणि सुंदर हवे असतात. केसांच्या वाढीसाठी आणि केस काळेभोर दिसण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण जीवनशैलीत होणारे बदल, मानसिक तणाव आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे तरूण वयातच केस पांढरे होऊन जातात. केस पांढरे होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला केमिकलयुक्त हेअर कलर्स, डाय, हेअर मास्क, हेअर सीरम इत्यादी अनेक गोष्टी करतात. पण वांरवांर हेअर कलर केल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होऊन जातात आणि केस झपाट्याने गळतात. त्यामुळे केसांची काळजी घेताना केमिकल हेअर कलरचा वापर करणे टाळावे.(फोटो सौजन्य – istock)

Eyebrow Hair Care: ७ दिवसांमध्ये भुवया होतील दाट! आयब्रो सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

पांढरे केस प्रामुख्याने काळे किंवा लाल केले जातात. मेहेंदी लावल्यामुळे केसांना लालसर रंग दिसू लागतो. मेहेंदीमध्ये असलेले रासायनिक घटक केसांची नैसर्गिक गुणवत्ता खराब करून टाकतात. त्यामुळे मेहेंदीचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर केसांसाठी करावा. बाजारातील हानिकारक केमिकल उत्पादनांचा वापर केल्यामुळे काही दिवसांपुरता फरक दिसून येतो. मात्र पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात. त्यामुळे पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी या पदार्थांचा वापर करुन बनवलेला हेअर मास्क वापरावा. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि केस काळेभोर दिसतील.

केसांना नैसर्गिक काळा रंग घरगुती उपाय:

केसांना नैसर्गिक काळा रंग येण्यासाठी सगळ्यात आधी सुकवलेले किंवा कच्चे आवळे ५ ते ६ तास पाण्यात भिजत घालून ठेवा. त्यानंतर आतील बिया काढून मध्यम आकारात तुकडे करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी आणि आवळे घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट लोखंडी कढईमध्ये ओतून रात्रभर तशीच झाकून ठेवा. यामुळे आवळ्याचा रंग गडद होण्यास मदत होईल. यामुळे पांढरे केस मुळांपासून काळे होण्यास मदत होईल आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळेल.

Hair Care: लग्नाच्या २ महिने आधीपासूनच घ्या केसांची काळजी! घनदाट केसांसाठी आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय केल्यास केस होतील घनदाट

लोखंडी कढईत ठेवलेली पेस्ट दुसऱ्यादिवशी व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा मिक्स आणि गरजेनुसार कोणतीही चांगली मेहेंदी मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात अजिबात गुठळ्या ठेवू नये. केसांवर मेहेंदी लावण्याआधी केस विंचरुन घ्यावेत. त्यानंतर केसांवर आणि स्कॅल्पवर तयार केलेली मेहेंदी लावून ३ तास तशीच लावून ठेवून द्या. मेहेंदी लावल्यानंतर डोक्यावर शॉवर कॅप घालणे फायदेशीर ठरेल. ३ तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. दुसऱ्या दिवशी शाम्पूने केस धुतल्यास केसांचा रंग काळा झालेला दिसेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदीचा वापर करता येतो का?

    Ans: मेहंदीमुळे केसांना नैसर्गिक तांबूस-तपकिरी किंवा लालसर छटा मिळू शकते. मात्र, शुद्ध मेहंदी पांढरे केस थेट काळे करत नाही.

  • Que: केसांना नैसर्गिक काळा रंग देण्यासाठी मेहंदी कशी लावावी?

    Ans: केसांना मेहंदी लावल्याने पांढऱ्या केसांवर तांबूस छटा येऊ शकते. अधिक गडद रंगासाठी काही जण इंडिगो पावडरचा वापर करतात. मात्र, उत्पादनाची गुणवत्ता तपासून आणि पॅच टेस्ट करूनच वापर करावा.

  • Que: केसांना मेहंदी लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

    Ans: मेहंदीतील घटकांची माहिती तपासा आणि त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. ‘ब्लॅक हिना’मध्ये PPD सारखे रसायन असू शकते, ज्यामुळे गंभीर अ‍ॅलर्जी होण्याचा धोका असतो.

Web Title: Natural black hair turn grey hair jet black right from the roots apply henna to your hair using this method for a natural black look sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Eyebrow Hair Care: ७ दिवसांमध्ये भुवया होतील दाट! आयब्रो सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
1

Eyebrow Hair Care: ७ दिवसांमध्ये भुवया होतील दाट! आयब्रो सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Hair Care: लग्नाच्या २ महिने आधीपासूनच घ्या केसांची काळजी! घनदाट केसांसाठी आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय केल्यास केस होतील घनदाट
2

Hair Care: लग्नाच्या २ महिने आधीपासूनच घ्या केसांची काळजी! घनदाट केसांसाठी आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय केल्यास केस होतील घनदाट

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क
3

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण
4

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.