
आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिनानिमित्त घ्या महत्त्वाची माहिती
गर्भपात हा प्रत्येत स्त्री साठी एक आव्हानात्मक निर्णय आहे. कारण स्त्रीच्या शारीरिक आरोग्यासोबतच तिच्या मानसिक आरोग्यावरही गर्भपात परिणाम करू शकतो. आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरातील महिलांना सुरक्षित गर्भपात काळजी आणि अधिकार मिळू शकतील याची खात्री करणे हा आहे. हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
असुरक्षित गर्भपातामुळे दरवर्षी हजारो महिलांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेण्याची चूक कधीही करू नये. कारण असे केल्याने अनेक घातक परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने काय दुष्परिणाम होतात हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. याबद्दल जाणून घेण्यासाठी डॉ. गीतांजली, नित्यश्री हेल्थकेअर, स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ आणि डॉ. साधना गुप्ता, FOGSI-मान्यता इनिशिएटिव्ह सदस्य आणि स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ यांची मदत घेतली असता त्यांनी योग्य माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
हेदेखील वाचा – अमेरिकन महिलांना घरीच करावा लागतोय गर्भपात; काय आहे नेमका मुद्दा?
काय सांगतात तज्ज्ञ
तज्ज्ञांच्या मदतीशिवाय कधीही स्वतःहून गर्भपाताची गोळी घेऊ नये
डॉ. गीतांजली यांनी सांगितले की, आजच्या पिढीमध्ये ओव्हर-द-काउंटर गर्भपात गोळ्या घेणे खूप सामान्य झाले आहे. विशेषतः किशोरवयीन मुली आणि महाविद्यालयीन मुलींमध्ये. Mifepristone आणि Misoprostol स्वतःच घेणे प्रभावी आहे असे मानले जात असले तरी, त्याच्याशी संबंधित अनेक धोके आहेत.
तर डॉ.गुप्ता यांनी सांगितले की, भारताच्या एमटीपी कायद्यानुसार गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात कायदेशीररीत्या परवानगी आहे, परंतु स्वत: गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने आरोग्याची मोठी हानी होऊ शकते. UFPA च्या अहवालानुसार, असुरक्षित गर्भपातामुळे दररोज सुमारे 8 महिलांचा मृत्यू होतो. त्यामुळे याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हेदेखील वाचा – गरोदरपणात चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी; होऊ शकतो गर्भपात
काय होते नुकसान
गर्भपाताच्या गोळ्यांमुळे काय होते