Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World No Tobacco Day : तंबाखूमुक्त दिनाआधी मंत्रालयात मोठी आरोग्य मोहीम; 200 हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी

जागतिक तंबाखूमुक्त दिन 2026 पूर्वी मंत्रालयात तंबाखूविरोधी जनजागृती आणि आरोग्य तपासणी उपक्रम राबवण्यात आला. HNCII आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित मोहिमेत 200 हून अधिक तपासण्या करण्यात आल्या, तर 550 पेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2026 | 12:43 PM
तंबाखूमुक्त दिनाआधी मंत्रालयात मोठी आरोग्य मोहीम; 200 हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी

तंबाखूमुक्त दिनाआधी मंत्रालयात मोठी आरोग्य मोहीम; 200 हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी

Follow Us
Follow Us:
  • मंत्रालयात तंबाखूविरोधी जनजागृती उपक्रम
  • 550 हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचला संदेश
  • कॅन्सर प्रतिबंधासाठी मंत्रालयात विशेष आरोग्य तपासणी
मुंबई : जागतिक तंबाखूमुक्त दिन 2026 पूर्वी, हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (HNCII) भारतातील हेड अँड नेक ऑन्कोलॉजीसाठी समर्पित पहिले आणि एकमेव विशेष संस्थान यांनी सलाम बॉम्बे फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय मुख्यालय मंत्रालय येथे कर्मचाऱ्यांसाठी तंबाखूविरोधी जनजागृती आणि आरोग्य तपासणी उपक्रम राबवला. या कार्यक्रमाचा उद्देश तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीस प्रोत्साहन देणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता वाढवणे हा होता.

या उपक्रमांतर्गत कर्मचारी आणि भेट देणाऱ्या नागरिकांसाठी 200 हून अधिक तपासण्या करण्यात आल्या. यामुळे हा उपक्रम यंदाच्या वर्षातील मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या आरोग्य तपासणी मोहिमांपैकी एक ठरला. HNCII च्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी तपासण्या केल्या तसेच तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व याविषयी जनजागृती सत्रे आणि खेळांच्या माध्यमातून 550 हून अधिक नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवला.

Mahabaleshwar News: पोलीस स्टेशनवर मॅप्रोचा लोगो का? ऑनलाइन तक्रारीनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यावरील खाजगी कंपनीचा फलक हटवला

भारतामध्ये कॅन्सरचे उशिरा निदान होण्याबाबत आरोग्य तज्ज्ञ चिंता व्यक्त करत असताना हा उपक्रम राबविण्यात आला. देशातील जवळपास 60 ते 70 टक्के कॅन्सर रुग्णांचे निदान प्रगत अवस्थेत होते, ज्यामुळे उपचारांची परिणामकारकता कमी होते. तंबाखू हे तोंड, डोके आणि मान कॅन्सरचे प्रमुख टाळता येण्याजोगे कारण असल्यामुळे जागरूकता, नियमित तपासणी आणि लवकर उपचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले.

या उपक्रमाबद्दल बोलताना, डॉ सुलतान प्रधान यांनी सांगितले की, “भारतामध्ये हेड अँड नेक कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि लवकर तपासणी व प्रतिबंधात्मक तोंडाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यंदाच्या जागतिक तंबाखूमुक्त दिनाची संकल्पना ‘Unmasking the Appeal: Countering Nicotine and Tobacco Addiction’ ही अधिक जागरूकता, प्रतिबंधात्मक कृती आणि वेळेवर हस्तक्षेपाचे महत्त्व अधोरेखित करते. मंत्रालयातील या उपक्रमाद्वारे आमचा उद्देश लोकांना नियमित आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करणे, जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या कार्यस्थळी तज्ज्ञ तपासणी सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. HNCII लवकर निदान आणि जनजागृतीसाठी कटिबद्ध आहे.”

तसेच महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “अशा उपक्रमांमुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि नियमित आरोग्य तपासणी तसेच तोंडाच्या आरोग्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मोठी मदत होते. जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त मंत्रालयात हा अर्थपूर्ण उपक्रम आयोजित केल्याबद्दल आम्ही HNCII, महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” महाराष्ट्रभर सार्वजनिक आरोग्य जनजागृती आणि तंबाखू नियंत्रण मोहिमांमध्ये सातत्याने कार्यरत असलेल्या सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांनी या उपक्रमाच्या अंमलबजावणीस सहकार्य केले.

हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्युट ऑफ इंडिया हे तोंडाचा कॅन्सर, कवटीच्या तळाचा कॅन्सर, थायरॉईड कॅन्सर, स्पीच आणि पुनर्वसन सहाय्य तसेच बहुविद्याशाखीय कॅन्सर उपचार यांसह हेड अँड नेक कॅन्सरच्या निदान, उपचार आणि व्यवस्थापनातील विशेष कौशल्यासाठी ओळखले जाते.

Health Department : शासकीय बदल्यांच्या धोरणावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उभी फूट; रद्द की नियमित, वाद तीव्र

Web Title: Ministry tobacco awareness health checkup hncii salaam bombay foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Health News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
1

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश
2

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
3

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
4

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.