
जागतिक योगा दिनाच्या दिवशी डेस्क योगा म्हणजे नक्की काय जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
भारताच्या सतत विकसित होणाऱ्या कॉर्पोरेट क्षेत्रात, कार्यालयीन जागेमधील हालचाल केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर एकूणच कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठीही आवश्यक बनत आहे. कार्यालयीन कर्मचारी दररोज ८–१० तास खुर्चीत बसलेले असतात. त्यामुळे अधिक चांगले ऑफिस डिझाइन, अॅक्टिव्ह कम्युटिंग, वॉकिंग मिटिंग्स आणि एर्गोनॉमिक सेटअपच्या माध्यमातून हालचालीचा समावेश करणे आवश्यक बनले आहे. आधुनिक ऑफिसेस आता ओपन कॉमन एरियाज आणि स्वास्थ्य केंद्रित लेआउट्ससह हालचाल करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केली जात आहेत. तरीदेखील, या बदलांनंतरही कर्मचाऱ्यांचे समाधान कमीच आहे.
केवळ २०% भारतीय कर्मचारी कामाच्या ठिकाणी स्वतःला खरोखरच “आनंदी” असल्याचे सांगतात. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ या वर्षीची संकल्पना “वन अर्थ, वन हेल्थ” अशी आहे. या संकल्पनेला अनुसरून अगदी सोप्या डेस्क योगासनांचे नियमित सराव नुसत्या एका जागेवर स्थिर बसण्याच्या सवयी मोडण्यात मदत करतात एवढेच नाही तर मानसिक स्पष्टता वाढवतात आणि अधिक ऊर्जावान, लवचीक आणि समाधानी कामगारवर्ग घडवू शकतात. डॉ. शुभदा करांडे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि एर्गोनॉमिक सल्लागार, इंटेरिओ यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
प्रो टिप: चांगल्या दर्जाचे एर्गोनॉमिक कीबोर्ड व माऊस पॅड यामुळे हा ताण कमी होतो, पण नियमित सरावाने रिपिटेटिव्ह स्ट्रेन इंज्युरीपासून बचाव होतो.
हे का उपयुक्त: पाठीला योग्य आधार देणाऱ्या एर्गोनॉमिक ऑफिस खुर्च्यांमुळे पाठीचा कणा निरोगी राहतो, पाठीच्या स्नायूंवरील ताण कमी होतो आणि अस्वस्थता दूर होत कामावर सहज लक्ष केंद्रित करता येते.
फर्निचरचा फायदा: हात व पाठ यांना चांगला आधार देणाऱ्या खुर्च्यांमुळे हे वळण्याचे व्यायाम अधिक सुरक्षितपणे आणि सखोल करता येतात.
वेलनेस फायदे: शारीरिक आराम आणि मानसिक शांतता यांचा संगम. ताणतणावपूर्ण, व्यस्त ऑफिस दिवसांसाठीचे उत्तम आसन
ऊर्जा वाढ: फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि ऑक्सिजन प्रवाह वाढवतो. दीर्घकालीन कामाच्या सत्रांमध्ये जागरूकता टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे.
International Yoga Day: सकाळीच होत नसेल पोट साफ, बद्धकोष्ठता होईल छुमंतर; ‘हे’ योगासन कराच
आधुनिक काळाची गरज: जे लोक तासनतास संगणकासमोर काम करतात त्यांच्यासाठी प्रीमियम मॉनिटर आर्म्स अत्यावश्यक आहेत. त्यामुळे स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर आणण्यास मदत होते, त्यामुळे ताण कमी होतो आणि सतत स्ट्रेचिंग करण्याची गरज राहत नाही.
हिप आरोग्य: सतत बसण्यामुळे होणाऱ्या हिप फ्लेक्सर टाइटनेसला प्रतिकार करून रक्ताभिसरण सुधारते.
नवीन आधुनिक भारतीय ऑफिस या आता अशा जागा बनत आहेत जिथे समकालीन डिझाइनमध्ये प्राचीन शहाणपणाची, ज्ञानाची सांगड घातली गेली आहे. या परिवर्तनामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य व एकाग्रता सुधारते आणि त्याच वेळी कार्यालयीन व्यवस्थापनाला उत्पादकतेत वाढ व आरोग्यविषयक खर्चात घट दिसते. परिणामी, काम करणाऱ्या लोकांचे हित खरोखरच साधणारे सर्वार्थाने योग्य असे कार्यस्थळ तयार होते.