Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Japan Tour Package : IRCTC दिल्लीहून जपानला जाण्याचे एक खास टूर पॅकेज घेऊन आला आहे. यात फ्लाईटचे तिकिट, राहण्याची-खाण्याची सोय तसेच लोकल ट्रान्सपोर्टचा खर्च अशा अनेक सुविधा पुरवल्या जातील. फक्त टूर पॅकेज बुक करा आणि जपान दर्शनाची तयारी करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 08:09 AM
IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर... जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर... जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Follow Us
Follow Us:
  • या खास परदेशी टूरमध्ये पर्यटकांना अनेक प्रसिद्ध शहरांसह ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देता येणार आहे.
  • प्रवासादरम्यान निवास, जेवण, स्थानिक वाहतूक, व्हिसा आणि इतर आवश्यक सुविधा पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत.
  • इच्छुक प्रवाशांसाठी बुकिंगपूर्वी काही आवश्यक कागदपत्रे आणि वैध पासपोर्ट असणे बंधनकारक आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) दिल्लीहून जपान फिरण्यासाठी ९ रात्री आणि १० दिवसांचे एक खास टूर पॅकेज लाँच केले आहे. या पॅकेज अंतर्गत, प्रवाशांना जपानमधील काही प्रसिद्ध शहरांची आणि ऐतिहासिक ठिकाणांची सैर करता येईल. ही यात्रा ६ सप्टेंबरपासून दिल्लीहून सुरु होत असून पर्यटकांना यात टोकियो, हाकोने, हामामात्सु, क्योटो, ओसाका, नारा आणि हिरोशिमा यांसारख्या प्रमुख जपानी शहरांना देता येईल. प्रवासी दिल्लीहून जपानच्या हानेडा एअरपोर्टसाठी उड्डाण भरतील आणि १५ सप्टेंबरला यात्रा संपवून पुन्हा भारतात परततील.

टूर पॅकेजची किंमत किती?

पॅकेजची किंमत ट्रिपल शेअरिंगच्या आधारावर प्रति व्यक्ती 3,45,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सोबतच ट्विन शेअरिंगसाठी प्रति व्यक्ती 3,49,999 रुपये खर्च आकारला जाणार आहे. जर प्रवाशाला एकटं खोलित रहाायचं असेल तर त्याला 4,73,999 रुपये इतका खर्च येईल. लहान मुलांसाठीची टूर पॅकेजमध्ये वेगळी किंमत निश्चित करण्यात आली आहे. ५ ते ११ वर्षांच्या मुलांसाठी बेडसह टूर पॅकेजची किंमत 2,92,499 रुपये इतकी असेल, तर विना बेड ही किंमत 2,63,999 रुपयांइतकी असेल.

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

पॅकेजमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतील?

IRCTC नुसार, या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील. यात दिल्ली ते जपानला जाण्यासाठी इकोनॉमी क्लास फ्लाइट टिकट, 4-स्टार हाॅटेलमध्ये राहण्याची सोय आणि जपानचा टूरिस्ट व्हिसा यांचा समावेश आहे. याशिवाय, प्रवासादरम्यान रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे देखील पॅकेजमध्ये समाविष्ट असेल. इतकंच नाही तर एअरपोर्टपासून हाॅटेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी लोकल ट्रांसपोर्टचा खर्च देखील या टूर पॅकेजमध्ये समाविष्ट असणार आहे. जपानमधील प्रमुख पर्यटन स्थळांच्या सहली एसी बसमधून आयोजित केल्या जातील. ७० वर्षांखालील प्रवाशांसाठी प्रवास विम्याचाही समावेश आहे. संपूर्ण प्रवासात माहिती आणि मार्गदर्शनासाठी टूर गाईड उपलब्ध असेल. लागू असलेले कर देखील पॅकेजच्या किंमतीत समाविष्ट आहेत.

फ्लाईटचा शेड्यूल काय?

पर्यटक ऑल निप्पॉन एयरवेजच्या (ANA) फ्लाईटने जपानला पोहचतील. ही फ्लाईट ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास दिल्लीहून उड्डाण घेईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.५५ वाजताच्या सुमारास हानेडा एयरपोर्टला दाखल होईल. जपानमधून भारतात परतताना हानेडा एअरपोर्टवर सकाळी ११.१० वाजता फ्लाईट टेक ऑफ करेल आणि ४.३० वाजता दिल्लीत दाखल होईल. तथापि, आयआरसीटीसीने म्हटले आहे की, हे विमान वेळापत्रक सध्या अंदाजित असून एअरलाइनच्या परिचालन गरजेनुसार त्यात बदल होऊ शकतो.

टूर पॅकेजमध्ये कोणकोणत्या ठिकाणांची सैर केली जाईल?

या १० दिवसांच्या टूर पॅकेजची सुरुवात टोकियोला भेट देण्यापासून होईल. इथे पर्यटकांना आसाकुसा मंदिर, नाकामिसे दोरी मार्केट, उएनो पार्क, ओडाईबा आणि टीमलॅब प्लॅनेट्स अशा प्रसिद्ध ठिकाणांची भेट करुन दिली जाईल. पर्यटकांना माऊंट फुजीचे पाचवे स्टेशन (ओशिनो हक्काई), ओवाकुदानी व्हॅली, हाकोने रोपवे आणि हाकोने पायरेट शिप क्रूझची सैरदेखील करवली जाईल. याशिवाय नागोयामधील टोयोटा संग्रहालय आणि एससीमॅगलेव्ह रेल्वे संग्रहालय, क्योटोचे अराशियामा बांबू फॉरेस्ट, किंकाकु-जी मंदिर आणि फुशिमी इनारी ताईशा, ओसाका किल्ला, नारा डियर पार्क आणि तोडाई-जी मंदिर या ठिकाणांचीही भेट पर्यटक या टूर पॅकेजमध्ये घेणार आहेत.

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

बुकिंगचे डिटेल्स

IRCTC नुसार, या टूरसाठी अर्ज करणाऱ्या प्रवाशांकडे परत येण्याच्या तारखेपासून किमान ६ महिने वैध असलेला पासपोर्ट असणे अनिवार्य आहे. बुकिंगवेळी पॅनकार्डसह अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज जमा करणे बंधनकारक असेल. याशिवाय जपानचा व्हिसा मिळवण्यासाठी प्रवाशांना आपली आर्थिक स्थिती आणि व्यावसायाशी जोडलेले काही कागदपत्रे जमा करावे लागतील.

Web Title: Irctc japan tour package 2026 price itinerary booking details 10 days trip from delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Japan
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
1

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
2

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
3

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
4

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.