Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता…;इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे काय? अशी ओळखा लक्षणे

Irritable Bowel Syndrome Symptoms: सतत पोटदुखी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होत असेल, तर ही इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) ची लक्षणे असू शकतात. या आजाराची कारणे, सुरुवातीची लक्षणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रभावी उपाय जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 09, 2026 | 08:25 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे काय?
  • IBS ची प्रमुख लक्षणे
  • कोणाला असतो अधिक धोका?
सतत पोटदुखी होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यांचा वारंवार त्रास होणे अनेकजण ही लक्षणे सामान्य समजून दुर्लक्षित करतात. मात्र, हीच लक्षणे इरिटेबल बोवेल सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome – IBS) या पचनसंस्थेशी संबंधित आजाराची असू शकतात. हा आजार जीवघेणा नसला तरी त्याचा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. वेळेवर निदान आणि योग्य आहार-जीवनशैली स्वीकारल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे काय? याची लक्षणे कशी ओळखायची, जाणून घ्या.

डोळ्यांना भास की तात्पुरता ताण? जाणून घ्या काय आहे ‘स्यूडो-मायोपिया’

IBS म्हणजे काय?

IBS हा आतडे आणि मेंदू यांच्यातील बिघडलेल्या समन्वयामुळे उद्भवणाऱ्या दीर्घकालीन पचनविकार आहे. या आजारामध्ये पोटात वारंवार दुखणे, शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे, अतिसार, बद्धकोष्ठता किंवा दोन्ही समस्या आळीपाळीने होऊ शकतात. हा आजार आतड्यांचे कायमस्वरूपी नुकसान करत नाही, मात्र रुग्णाच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

IBS ची प्रमुख लक्षणे

IBS असलेल्या व्यक्तींमध्ये पोटात क्रॅम्प येणे, वारंवार पोटदुखी, पोट फुगणे, गॅस होणे, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, तसेच शौचाच्या सवयींमध्ये सतत बदल होणे ही सामान्य लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांना शौचानंतरही पूर्णपणे पोट साफ न झाल्याची भावना जाणवू शकते. ही लक्षणे काही कधी कधी जास्त त्रासदायक होऊ शकतात.

कोणाला असतो अधिक धोका?

सततचा ताण, चिंता, अनियमित आहार, झोपेची कमतरता आणि काही विशिष्ट पदार्थांमुळे IBS ची लक्षणे वाढू शकतात. महिलांमध्ये हा त्रास तुलनेने अधिक दिसून येतो. काही रुग्णांमध्ये मसालेदार पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ किंवा कॅफिनयुक्त पेयेही लक्षणे वाढवू शकतात.

कशी घ्याल काळजी?

IBS वर कायमस्वरूपी उपचार नसले तरी योग्य आहार, नियमित व्यायाम, ताण-तणाव नियंत्रण, पुरेशी झोप आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते. लक्षणे वारंवार दिसत असल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

दुर्लक्ष करू नका

जर पोटदुखीसोबत वजन झपाट्याने कमी होणे, शौचातून रक्त येणे, सतत तीव्र वेदना किंवा इतर गंभीर लक्षणे दिसत असतील, तर त्वरित वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे IBS मुळे होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

भारतातील सर्वात ‘हॉन्टेड’ बीच! काळी वाळू, भुतांच्या कथा अन्…; सूर्य मावळताच का घाबरतात पर्यटक?

Web Title: Irritable bowel syndrome ibs symptoms causes treatment stomach problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • acidity
  • daily health care news
  • gas
  • stomach

संबंधित बातम्या

रात्रीच्या जेवणानंतर अजिबात करू नका ‘या’ चुका, अन्यथा उद्भवतील पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता वाढून शरीराचे होईल नुकसान
1

रात्रीच्या जेवणानंतर अजिबात करू नका ‘या’ चुका, अन्यथा उद्भवतील पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता वाढून शरीराचे होईल नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.