नवरात्रीमधील नऊ दिवसांचा उपवास सोडताना फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करून देवीची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. याशिवाय नवरात्रीमध्ये महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये आहारात साबुदाणा वडे, भगर, शेंगदाण्याचे लाडू, बटाट्याची भाजी, राजगिरा लाडू इत्यादी ठराविक उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. दिवसभरातून एकदा किंवा दोनदा अन्नपदार्थ खाल्ले जातात. याशिवाय सगळ्यांचा तिखट, गोड किंवा तळलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण अतिप्रमाणात या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय पोटात गॅस होणे, पोटात जडपणा वाटणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणात साबुदाणे खाल्यानंतर सुद्धा अपचन होण्याची शक्यता असते.
उत्सवाच्या कालावधीमध्ये नऊ दिवस उपवास केला जातो. या उपवासाच्या दिवसांमध्ये शरीराला अतिशय कमी प्रमाणात अन्नपदार्थ खाण्याची सवय लागते. आहारात अतिशय निवडक पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे उपवास सोडल्यानंतर पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू नये. म्हणून शरीराची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला नवरात्रीचा उपवास सोडताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे कोणतीही पचनाची समस्या उद्भवणार नाही.
नऊ दिवस उपवास केल्यानंतर पोटाला अतिशय कमी प्रमाणात अन्नपदार्थ खाण्याची सवय लागते. याशिवाय उपवासाच्या दिवसांमध्ये अतिशय साध्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे उपवास सोडताना तेलकट किंवा अतितिखट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. याशिवाय दिवसभर कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहील. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी ताक, लिंबूपाणी किंवा साध्या पाण्यात बनवलेले कोणतेही सरबत पिऊ शकता. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल आणि शरीर कायमच निरोगी राहील.
उपवास सोडल्यानंतर आहारात अतिशय साध्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते. फळं, उकडलेले बटाटे, राजगिरा भाकरी, शेंगदाण्याची आमटी नऊ दिवस खाल्ल्यानंतर उपवास सोडताना अतिशय कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे. जेवणाच्या ताटातील पदार्थांवर तूप टाकून खाल्ल्यास खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. पोटाला थंडावा देण्यासाठी केळी, गूळ, दुध इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.याशिवाय उपवास सोडल्यानंतर लगेच कोणत्याही तिखट आणि पचनास जड जाणाऱ्या पदार्थांचे सेवन न करता मऊ भात किंवा डाळ भात खावा.
उपवासाचे मुख्य फायदे:
उपवासाने शरीरातील चरबी कमी होते आणि स्नायूंची ताकद वाढते, कारण ग्रोथ हार्मोनचा स्त्राव वाढतो. उपवास इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतो आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
उपवास कसा करावा?
या पद्धतीत तुम्ही ठराविक वेळेसाठी सामान्य आहार घेता आणि काही तास किंवा दिवसांच्या ठराविक वेळेसाठी उपवास करता. यात दररोज 16 तास उपवास केला जातो आणि 8 तासांच्या आत खाल्ले जाते, असे ही उपवासाची एक पद्धत आहे.