
थंडीमुळे त्वचा कोमेजली आहे? मग गुलाब पाण्यात मिक्स करून लावा 'हा' पदार्थ
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स, मुरूम आणि फोड येऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. चेहऱ्यावर आलेले मुरूम आणि पिंपल्स लवकर बरे होतात, मात्र त्वचेवरील काळे डाग कमी होत नाहीत. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे त्वचा आणखीनच खराब दिसू लागते. चेहऱ्यावरील डाग-चट्टे, सोलवटलेली त्वचा, कोरडेपणा कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. पण वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्ट, स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते. (फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कोमेजलेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर करण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रभावी ठरतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी गुलाब पाण्यात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. गुलाब पाण्याचा वावर मागील बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे. यामध्ये असलेले घटक त्वचा हायड्रेड ठेवतात आणि उन्हामुळे काळवंडलेला चेहरा पुन्हा उजळदार करण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. अशावेळी चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम आणि त्वचा खूप जास्त पांढरी दिसू लागते. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गुलाब पाण्यात बटाटा रस मिक्स करून लावावा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी होतात आणि त्वचा खूप जास्त चमकदार दिसते. बटाट्याचा रस त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतो. यामुळे त्वचा मऊ आणि सुंदर दिसते.
त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय प्रभावी आहे. वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात बटाटा रस टाकून मिक्स करा. कापसाच्या गोळ्याने तयार केलेली मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर काही वेळाने त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. बटाट्याच्या रसात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळदार होण्यास मदत होते. गुलाब पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा थंड राहते आणि त्वचेमधील उष्णता कमी होऊन पिंपल्स आणि मुरूम येत नाहीत.
डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग घालण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. गुलाब पाण्यात बटाट्याचा रस मिक्स करून डोळ्यांभोवती लावावे. काहीवेळ ठेवल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. बटाट्याच्या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे काळे डाग कमी होण्यास मदत होईल. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात.