थंडीतही चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो! गुलाब पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी आणि रखरखीत होऊन जाते. चेहऱ्यावर रॅश, पिंपल्स, मुरूम आणि त्वचेच्या इतर समस्या वाढू लागतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर सुरुवातीला महिला कायमच दुर्लक्ष करतात. मात्र कालांतराने त्वचेच्या समस्या वाढू लागतात आणि त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी कायमच बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरले जातात. पण कोणत्याही महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी गुलाब पाण्याचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. गुलाब पाणी त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करते. मागील अनेक वर्षांपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर तुम्ही गुलाबपाणी लावू शकता. यामुळे त्वचेचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी गुलाब पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
पूर्वीच्या काळी त्वचेची काळजी घेण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जायचा. मुलतानी मातीच्या वापरामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन जाते आणि त्वचा अतिशय चमकदार, सुंदर होते. यासाठी वाटीमध्ये चमचाभर मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट तयार करावी. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवून द्या. यामुळे त्वचा सॉफ्ट होण्यास मदत होईल. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास आठवडाभरात त्वचा अतिशय चमकदार दिसेल.
गुलाब पाण्यात चंदन पावडर मिक्स करून तुम्ही लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, डाग आणि त्वचेच्या बऱ्याच समस्या कमी होतील. वाटीमध्ये चंदन पावडर घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करा. जास्त पातळ पेस्ट बनवू नका. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळा तशीच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. चंदन पावडरमुळे त्वचा थंड राहते. याशिवाय त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते.
आयुर्वेदिक फुलांचा कमाल : काळे, घनदाट आणि मजबूत केसांसाठी नैसर्गिक उपाय
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेल चेहऱ्यावर लावले जाते. कोरफड जेलमध्ये असलेले घटक त्वचेवरील पिंपल्स आणि ऍक्ने कमी करण्यास मदत करतात. गुलाब पाण्यात कोरफड जेल मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा खूप जास्त हायड्रेट होईल. तसेच चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. कोरफड जेल त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करते. त्यामुळे नियमित कोरफड जेल चेहऱ्यावर लावावे.






