Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diabetes: गूळ की साखर? कोणामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढते? जाणून घ्या सत्य

Sugar or Jaggery What Causes Sugar Spike: गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ अधिक आरोग्यदायी मानला जातो. परंतु, दोन्हींचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी गूळ आणि साखर यांचा शरीरावर होणारा परिणाम नीट समजून घेणे गरजेचे आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 18, 2026 | 07:09 PM
Diabetes: गूळ की साखर? कोणामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढते? जाणून घ्या सत्य
Follow Us
Follow Us:
  • गूळ की साखर?
  • कोणामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढतो?
  • मधुमेहींनी काय लक्षात ठेवावे?
गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. गूळ हा नैसर्गिक असून त्यात काही प्रमाणात खनिजे असल्यामुळे तो साखरेपेक्षा अधिक आरोग्यदायी मानला जातो. मात्र, रक्तातील साखरेच्या पातळीवर गूळ आणि साखर यापैकी कोणाचा अधिक परिणाम होतो, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या दोन्ही पदार्थांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे.

गुळामध्ये असतात पोषक घटक

गूळ हा ऊसाच्या रसापासून तयार केला जातो. तो कमी प्रक्रिया केलेला असल्यामुळे त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी काही खनिजे आढळतात. दुसरीकडे, पांढरी साखर ही पूर्णपणे शुद्धीकरण प्रक्रियेतून तयार होत असल्याने त्यामध्ये पोषणमूल्य जवळपास शून्य असते. त्यामुळे अनेकजण गुळाला अधिक आरोग्यदायी पर्याय मानतात.

रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम?

तज्ज्ञांच्या मते, गूळ आणि साखर या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि सुक्रोज असते. त्यामुळे दोन्ही पदार्थांचे सेवन केल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी(Blood Sugar Spike)  वाढते. गूळ नैसर्गिक असला तरी तो रक्तातील साखर वाढवत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. काही अभ्यासांमध्ये गुळामुळे साखरेची वाढ किंचित मंद गतीने होत असल्याचे दिसून आले असले तरी दोन्हींचा एकूण परिणाम जवळपास सारखाच मानला जातो.

मधुमेहींनी काय लक्षात ठेवावे?

  • गूळ हा साखरेचा पर्याय असला तरी तो ‘शुगर-फ्री’ नाही.
  • मधुमेह असलेल्या व्यक्तींनी गुळाचे सेवनही मर्यादित प्रमाणात करावे तसेच, शक्य तितके टाळावे.
  • गोड पदार्थ खाताना एकूण साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.
  • केवळ गूळ वापरल्याने रक्तातील साखर वाढणार नाही, असा समज चुकीचा आहे.

तज्ज्ञांचा सल्ला

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गूळ आणि साखर यांपैकी कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाणे योग्य नाही. गुळामध्ये काही पोषक घटक असले तरी त्याचे अतिसेवन केल्यास वजन वाढणे, रक्तातील साखरेत चढ-उतार होणे आणि इन्सुलिन प्रतिकार वाढण्याचा धोका राहतो. त्यामुळे गूळ असो किंवा साखर, दोन्ही पदार्थांचे सेवन संतुलित प्रमाणात करणे हाच आरोग्यदायी पर्याय ठरतो. त्यामुळे गोड पदार्थ खाताना प्रमाणावर नियंत्रण ठेवणे हाच सर्वात महत्त्वाचा नियम आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Colon Cancer: आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी करायचा आहे? रोज खा ‘हे’ सुपरफूड्स

Web Title: Jaggery vs sugar blood sugar impact diabetes health benefits explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Diabetics
  • Health Care Tips
  • Sugar
  • sugar cane

संबंधित बातम्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
1

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या
2

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
3

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब
4

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.