Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5000 वर्षे जुनं ठिकाण, जिथे पांडवांनी केला होता निवास! भीमकुंडात स्नान करताच दूर होतात सर्व आजार

राजस्थानला जात असाल तर येथील विराटनगरला जायला अजिबात विसरू नका. वनवासात पांडवांनी येथे आश्रय घेतला होता. आजही इथे भीमच्या पावलांचे ठसे आढळतात ज्याचे आता कुंडात रूपांतर झाले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2025 | 08:56 AM
5000 वर्षे जुनं ठिकाण, जिथे पांडवांनी केला होता निवास! भीमकुंडात स्नान करताच दूर होतात सर्व आजार

5000 वर्षे जुनं ठिकाण, जिथे पांडवांनी केला होता निवास! भीमकुंडात स्नान करताच दूर होतात सर्व आजार

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान हे फिरण्यासाठीचे एक लोकप्रिय आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. इथे तुम्हाला प्राचीन किल्ले, राजवाडे, तलाव आणि अगदी हिरवेगार डोंगरसुद्धा पाहायला मिळतात. जर तुम्हाला महाभारताशी संबंधित इतिहासात रस असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, राजस्थानात पांडवांशी संबंधित अनेक पौराणिक स्थळं आहेत जिथे त्यांनी काही काळ घालवला होता. आज आपण अशाच एका ऐतिहासिक स्थळाची माहिती घेणार आहोत जे जयपूरजवळचं स्थित आहे. या ठिकाणाचे नाव आहे विराटनगर, हे ठिकाण पांडवांच्या इतिहासाशी घट्ट जोडलेलं आहे.

कैलास पर्वताचे 5 रहस्य जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील; का आजवर कुणीही यावर चढू शकलं नाही? ‘

विराटनगरमधील श्री भीमसेन मंदिर

विराटनगर हे प्राचीन श्री भीमसेन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भीम हे पाच पांडवांपैकी एक होते आणि आजही त्यांची अपार शारीरिक ताकद व शौर्य यासाठी त्यांना ओळखलं जातं. जयपूरपासून सुमारे ३ किलोमीटर आत डोंगरामध्ये हे प्राचीन मंदिर आहे, जे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

विराटनगरमध्ये पांडवांनी घालवला अज्ञातवास

राजस्थानात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना विराटनगराबद्दल फारशी माहिती नसते. पण जर तुम्हाला ऐतिहासिक व पौराणिक स्थळांची माहिती घ्यायची असेल, तर या ठिकाणी एकदा तरी नक्की जावं. महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासाच्या दरम्यान काही काळ येथे वास्तव्य केलं होतं. येथील भीम कुंड नावाच्या ठिकाणाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. स्थानिकांच्या मते, या कुंडाचं पाणी कधीच आटत नाही, जरी उन्हाळ्यात तापमान कितीही वाढलं तरी. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही.

दगडात उमटलेलं भीमचं पाऊल

स्थानिक लोकांच्या कथेनुसार, येथे दगडांवर भीमचे पावलांचे ठसे आजही स्पष्टपणे दिसतात. यापैकी एक ठसा इतका मोठा आहे की त्यामध्ये पाणी साठलेलं असून तो आज भीम कुंड म्हणून ओळखला जातो. या पावलाचा आकार अंदाजे १५ फूट लांब व ४ फूट रुंद आहे. हे कुंड वर्षभर आणि दिवसरात्र पाण्याने भरलेलं असतं. पावसाळ्यात तर यातील पाण्याची पातळी आणखीनच वाढते. विशेष म्हणजे, या कुंडात पाणी कुठून येतं हे आजपर्यंत कोणी शोधू शकलेलं नाही.

विटा-सिमेंट नाही! 3D तंत्रज्ञानाने स्वित्झर्लंडमध्ये बनवण्यात आला जगातील सर्वात उंच टॉवर; फार अद्भुत आहे याची रचना

भीम कुंडात स्नान करणे शुभ मानले जाते

राजस्थानसह आसपासच्या भागांतील लोक जेव्हा हे ५००० वर्षे जुने ठिकाण पाहायला येतात, तेव्हा भीम कुंडात स्नान करणं ते शुभ मानतात. त्यांच्या मते, या कुंडाच्या पाण्याने स्नान केल्यास सर्व रोग दूर होतात. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने ते पिऊ नये.

विराटनगर कसे गाठाल?

विराटनगर हे राजस्थानच्या जयपूर जिल्ह्याच्या उत्तरेला वसलेलं एक ऐतिहासिक शहर आहे. येथे जाण्यासाठी प्रथम तुम्हाला जयपूरपर्यंत पोहचावं लागेल. दिल्लीहून जयपूरसाठी थेट बस व ट्रेन सेवा उपलब्ध आहे. जयपूरपासून विराटनगरची अंतर सुमारे ९५.५ किलोमीटर आहे, जे दोन तासांत पार करता येतं. विराटनगरात पोहोचल्यानंतर सुमारे ३ किलोमीटर आत गेल्यावर तुम्हाला प्राचीन श्री भीमसेन मंदिर आणि त्याच परिसरात असलेला भीम कुंड पाहायला मिळेल.

Web Title: Jaipur viratnagar bhimsen temple is the place where pandvas lived durinh vanvas here bhimsen kund is famous to cure disease travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • temple
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
2

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून
3

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
4

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.