
Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर
मधुमेहींसाठी जांभूळ एक वरदान मानले जाते. यामध्ये ‘जंबोलिन’ नावाचे एक संयुग असते, जे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखते. केवळ फळच नाही, तर जांभळ्याच्या बियांची पावडरसुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. म्हणून मधमेही रुग्णांनी दररोजच्य आहारात जांभूळचा समावेश केला पाहिजे.
उन्हाळ्यात पचनक्रिया अनेकदा मंदावते, ज्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात. जांभळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. म्हणून जांभूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळते.
जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे उन्हाळ्यात त्वचेला सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांपासून वाचवतात. तसेच जांभूळ खाल्ल्यामने रक्त शुद्ध होते, ज्यामुळे पिंपल्स, डाग दूर होण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत होते. जांभळाचे नियमित सेवन त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
जांभूळ नियमित खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. या फळामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पॅरालिसिसि सारख्या गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
जांभूळमधील आयरन शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे ॲनिमिया कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त, त्यातील व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.
जांभळामध्ये असलेले पोषक घटक मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. काही अभ्यासांनुसार, या फळाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढू शकते.
तु्म्ही जांभूळ कच्च्या स्वरूपात खाऊ शकता किंवा अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करू शकता. जसे की, मीठ किंवा काळे मीठ लावून, दहीसोबत, फ्रूट सॅलडमध्ये, किंवा ज्यूस किंवा शेक स्वरूपात खाऊ शकता. ताजे आणि पूर्णपणे पिकलेले जांभूळ खाल्ल्यास त्याचे फायदे अधिक मिळतात.
Hair Care Tips: खाज, घाम आणि कोंडा… उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर, फक्त करा ‘हे’ सोपे उपाय