Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढणारा ताण कमी करण्यासाठी जपानी जीवनशैलीतील काही साध्या सवयी उपयुक्त ठरू शकतात. स्वच्छता, निसर्गाशी नातं आणि स्वतःसाठी वेळ देण्यासारख्या छोट्या गोष्टी मनाला शांत ठेवण्यास मदत करू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 09, 2026 | 11:17 AM
आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

Follow Us
Follow Us:
  • दिवसाची सुरुवात शांतपणे करा; स्वतःसाठी वेळ द्या
  • स्वच्छता आणि अनावश्यक वस्तूंचा अपव्यय टाळण्याची सवय लावा
  • निसर्गाशी नातं जोडा आणि स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवा
रोजची धावपळ, कामाचा ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेकांना स्वतःसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. सततचा ताण, अपुरी विश्रांती, व्यायामाचा अभाव आणि विस्कळीत दिनचर्या याचा परिणाम आपल्या मनःशांतीवरही होऊ शकतो. अशा परिस्थितीत जपानी जीवनशैलीतील काही छोट्या आणि शिस्तबद्ध सवयी आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरू शकतात.

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी

स्वच्छतेला द्या महत्त्व

जपानी संस्कृतीत स्वच्छता ही केवळ घरकाम मानली जात नाही. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं ही शिस्तीची सवय मानली जाते. दररोज काही मिनिटं वस्तू व्यवस्थित लावणे, अनावश्यक सामान बाजूला करणे आणि घर स्वच्छ ठेवणे यामुळे वातावरण अधिक नीटनेटके राहू शकते.

सकाळची सुरुवात शांतपणे करा

जपानी जीवनशैलीत दिवसाची सुरुवात लवक करण्याला महत्त्व दिलं जातं. सकाळी उठल्यानंतन लगेच मोबाईल किंवा कामात व्यस्त होण्याऐवज स्वतःसाठी थोडा वेळ देता येतो. हलका व्यायाम ध्यान, चहा-कॉफीचा आस्वाद किंवा दिवसाच्च नियोजन अशा छोट्या गोष्टी सकाळची धावपळ कर्म करण्यास मदत करू शकतात.

वस्तूंची किंमत

‘मौताइनाई’ ही जपानी संकल्पना अनावश्यक अपव्यय टाळण्यावर भर देते. एखादी वस्तू खराब झाली म्हणून लगेच फेकून देण्याऐवजी ती दुरुस्त करून वापरता येते का, याचा विचार करण्याची ही सवय आहे, कपडे, फर्निचर किवा घरातील इतर वस्तूंचा योग्य वापर आणि पुनर्वापर केल्याने कचरा कमी करण्यास मदत होऊ शकते.

निसर्गाशी नातं जोडा

‘शुन’ या जपानी संकल्पनेत योग्य हंगामातील गोष्टींचा आनंद घेण्यावर भर दिला जातो. आपल्या जीवनातही मोसमी फळ-भाज्या खाण, ऋतूमध्ये होणारे बदल अनुभवणं आणि निसर्गाकडे लक्ष देणे याचा समावेश करता येतो. दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ निसर्गासाठी काढल्याने मनाला विरंगुळा मिळू शकतो.

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

आंघोळीचा वेळ स्वतः साठी ठेवा

  • दिवसभराच्या धावपळीनंतर काही वेळ शांतपणे आराम करणं महत्त्वाचं आहे. जपानी संस्कृतीत कोमट पाण्यात काही वेळ आराम करण्याची पद्धत आहे. आंघोळ करताना काही मिनिटं मोबाईल आणि इतर गोष्टींपासून दूर राहून स्वतःसाठी वेळ देता येतो.
  • अन्नाबद्दल कृतज्ञ राहा जपानमध्ये जेवण सुरू करण्यापूर्वी ‘इतादाकिमासु’ म्हणण्याची परंपरा आहे. यामागे अन्न आणि ते तयार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. आपणही जेवताना काही क्षण थांबून अन्नाबद्दल आभार मानण्याची सवय लावू शकतो.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Japanese lifestyle habits for happy stress free life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
1

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत
2

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
3

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
4

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.