Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे

Jeera Water For Weight Loss: जर तुम्ही देखील तुमच्या आहारात जिऱ्याच्या पाण्याचा समावेश करायचा विचाक करत असाल तर सर्वप्रथम त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 17, 2026 | 09:20 PM
Jeera Water For Weight Loss

Jeera Water For Weight Loss

Follow Us
Follow Us:
  • जिऱ्याचं पाणी वजन कमी करतं का?
  • जाणून घ्या फायदे
  • ‘हे’ तोटेही लक्षात ठेवा
जिरे हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे. परंतु आजकाल जिऱ्याचा वापर केवळ अन्नाची चव वाढवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. जिरे भिजवून किंवा उकळून तयार केलेले पाणी देखील अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. सोशल मीडियावर, सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याबद्दल अनेक दावे केले जातात. काही जण याला पचन आणि वजन नियंत्रणासाठी फायदेशीर मानतात, तर काही जण याला डिटॉक्स पेय म्हणतात. परंतु, याचे परिणाम प्रत्येकासाठी सारखेच असतील असे नाही. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पीत असाल किंवा त्याचा तुमच्या आहारात समावेश करण्याचा विचार करत असाल, तर त्याचे संभाव्य फायदे आणि तोटे कोणते, जाणून घ्या.

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

पचनास मदत करते

जिऱ्यामधील काही नैसर्गिक घटक पचनक्रियेवर परिणाम करू शकतात. काही लोकांना जिऱ्याचे पाणी प्यायल्यानंतर पोट फुगणे किंवा अपचन यांसारख्या त्रासापासून आराम मिळू शकतो. परंतु, जर तुम्हाला पचनाच्या समस्या सतत जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते

सकाळी एक ग्लास जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीराला हायड्रेशन मिळू शकते. जर त्यात अतिरिक्त साखर किंवा कॅलरीज नसतील, तर ते पाण्याला पर्याय ठरू शकते.

वजन कमी करण्यासाठी हे किती फायदेशीर?

जिऱ्याच्या पाण्याला वजन कमी करणारे चमत्कारिक पेय मानणे योग्य नाही. वजन कमी करण्यासाठी, एकूण कॅलरी सेवन, संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाल अधिक महत्त्वाची आहे. केवळ जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी असा कोणताही दावा नाही.

जिऱ्याच्या पाण्याचे तोटे

अतिसेवनामुळे पोटाच्या समस्या

मोठ्या प्रमाणात जिरे किंवा जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने काही लोकांना छातीत जळजळ, गॅस किंवा पचनाच्या इतर समस्या होऊ शकतात.

रक्तातील साखरेवर परिणाम

जिऱ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, मधुमेहाची औषधे घेणाऱ्या लोकांनी नियमितपणे किंवा मोठ्या प्रमाणात जिऱ्याचे पाणी पिण्यास सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील किंवा तुम्ही नियमित औषधे घेत असाल, तर रोजच्या आहारात जिऱ्याच्या पाण्याचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गर्भधारणा आणि इतर आरोग्य स्थिती

गर्भवती महिला किंवा कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी कोणताही घरगुती उपाय नियमितपणे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम

Web Title: Jeera water weight loss benefits side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • drinking water tips
  • health care news
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला
1

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस
2

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.