
मकरसंक्रांतीच्या साडी खरेदीसाठी ठाण्यातील k2fashion उत्तम पर्याय
हिंदू धर्मात मकर संक्रांत सणाला खूप जास्त महत्व आहे. कारण हा सण नवीन वर्षाच्या सुरुवातीला येतो. यादिवशी सर्वच महिला काळ्या रंगाची साडी नेसतात. संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला खूप जास्त महत्व असते. काळ्या रंगाच्या सुंदर साडीवर हलव्याचे दागिने परिधान केले जातात. तसेच मकरसंक्रांत हा एकमेव सण आहे, ज्यादिवशी काळ्या रंगाच्या कपड्यांना खूप जास्त महत्व दिले जाते. संक्रांतीच्या आधी सर्वच महिला काळ्या रंगाची साडी खरेदी करतात. काळ्या रंगाची बनारसी साडी, पैठणी साडी, डिझायनर साडी इत्यादी काही ठराविक फ्रॅबिकमधील साड्यांची खरेदी केली जाते. पण मकरसंक्रांतीच्या फोटोशूट किंवा हळदीकुंकू कार्यक्रमासाठी तुम्हाला जर काळ्या रंगाची युनिक आणि खण फ्रॅबिकमधील साडी हवी असेल तर K2 फॅशन या स्टोरला नक्कीच भेट द्या. त्यांच्याकडे अस्सल खणाचा वापर करून तयार केलेल्या हॅण्डलूम साड्या उपलब्ध आहेत. चला तर पाहुयात सविस्तर.(फोटो सौजन्य – navarashtra)
मुंबईत भरलेत मकरसंक्रांत स्पेशल Exhibition! साड्या, ब्लाऊजचे सुंदर आणि हटके पर्याय उपलब्ध
ठाण्यातील K2 फॅशन मध्ये तुम्हाला खणाच्या काळ्या साड्यांचे असंख्य प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्याकडे असलेली प्रत्येक खणाची साडी नाविन्यपूर्ण आहे. खणाच्या साड्यांचे कलेक्शन पाहून तुम्हीसुद्धा भारावून जाल. त्यामुळे नेमकी कोणती साडी खरेदी करावी? याबद्दल अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतील. तिथे गेल्यानंतर तुम्हाला K2 फॅशनच्या केतकी खणाच्या साड्यांचा वेगळेपणा समजावून सांगितली त्यामुळे खण हा साडीचा नुसता प्रकार नसून तो एक अभ्यास आहे. त्यांच्याकडे खणाच्या साड्यांव्यतिरिक्त बनारसी साडी, कॉटन हॅण्डलूम इरकली साडी, कतान सिल्क बनारसी साडी, गंगा जमुना बॉर्डर प्युअर सिल्क हॅण्डलूम साडी, सुंदरी कलेक्शन इत्यादी नवनवीन प्रकारातील साड्यांचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल. साड्यांची खरेदी करण्यासाठी तुम्ही ठाण्यातील दुकानात किंवा @k2fashioncloset या इंस्टाग्राम पेजवरून सुद्धा ऑनलाईन साडी मागवू शकता.
मकरसंक्रांतीनिमित्त खण आणि इरकल किंवा वेगवेगळ्या रंगाचे कॉम्बिनेशन करून तयार केलेल्या साड्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.मोठ्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी त्यांच्याकडे युनिक कलेक्शन आहे. त्यात पदरावर हॅण्ड पेंटिंग करून बनवलेली सुंदर साडी तुम्ही कोणत्याही कार्यक्र्मात किंवा ऑफिसमध्ये नेसण्यासाठी घेऊ शकता. अनेकांना खूप हेवी किंवा मोठे काठ असलेली साडी नको असते, अशावेळी तुम्ही हॅण्डलूम इरकल साडी खरेदी करू शकता. येणाऱ्या मकरसंक्रांत सणाला जर तुम्हाला युनिक साडी हवी असेल तर नव्याने तयार केलेली बनारसी कतान सिल्क साडी खरेदी करू शकता. या साड्यांचा लुक खूप रॉयल दिसतो. K2 फॅशन मध्ये केवळ साडीचं नाहीतर साडीला मॅच होईल असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस सुद्धा मिळतो.
K2 फॅशन या मराठमोळ्या ब्रँडच्या खण पैठणी केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे कस्टमायझेशन करून तयार केलेल्या आकर्षक आणि युनिक साड्या सुद्धा पाहायला मिळतील. K2 फॅशन मराठमोळ्या अभिनेत्रींचा आवडता ब्रँड आहे. त्यामुळे हातमागावर विणलेली खणाची एकतरी साडी प्रत्येक महिलेकडे असायला हवी. त्यांच्याकडे केवळ साड्याच नाहीतर हॅण्ड पेंटिंग केलेले ब्लाऊज, रेडिमेड ब्लाऊज, सिल्क लेहेंगा, अस्सल खणाचे दुप्पटे, गायत्री इरकली साडी इत्यादी असंख्य वेगवेगळे युनिक आणि हटके कलेक्शन पाहायला मिळेल. त्यामुळे यंदाच्या मकरसंक्रांतीला ठाण्याच्या K2 फॅशनमधून नक्कीच साड्यांची खरेदी करा.
K२ फॅशन पत्ता: दुकान क्रमांक 19 तळमजला, लोढा बुलेवर्ड मॉल, मॅकडोनाल्ड जवळ, साईनाथ नगर, माजिवडा, ठाणे, महाराष्ट्र 400601