पारंपरिकसह ट्रेंडी हलव्याच्या दागिन्यांची रेलचेल, तुमच्या आवडीच्या डिझाईनही त्वरीत मिळतील
हिंदू धर्मात मकरसंक्रांत सणाला विशेष महत्व आहे. कारण यादिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यंदाच्या वर्षी १४ जानेवारीला मकरसंक्रात तर १५ जानेवारीला किंक्रांत असते. घरात सुगड पूजन करून हळदीकुंकू साजरा केले जाते. महाराष्ट्रामध्ये मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. काळ्या रंगाचे कपडे परिधान करून त्यावर हलव्याचे सुंदर सुंदर दागिने परिधान केले जातात. संक्रांतीच्या दिवशी हलव्याच्या दागिन्यांना विशेष महत्व आहे. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारातील हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. हलव्याचे दागिने नवीन वर्ष गोड आणि आनंदाने जावे, यासाठी हलव्याचे दागिने परिधान केले जातात. नवविवाहित जोडपी आणि लहान मुलांसाठी हा एक कौतुकाचा सोहळा आहे, जो समृद्धी, आनंद आणि नव्या नात्यांची सुरुवात सुंदर करतो.(फोटो सौजन्य – navarashtra)
मकरसंक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. या सणानंतर कापणीच्या हंगामाला सुरुवात होते. मकर संक्रांतीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातसुद्धा हलव्याच्या दागिन्यांना खूप जास्त महत्व आहे. दागिने बनवण्यासाठी साखर, तीळ आणि साबुदाण्याचा वापर केला जातो. पण बऱ्याचदा हलव्याचे दागिने कुठून खरेदी करावेत? असा प्रश्न कायमच महिलांना पडतो. पण ठाण्यातील या दुकानात तुम्हाला सहज वेगवेगळ्या डिझाईनचे आणि कस्टमायझेशन करून बनवलेले दागिने खरेदी करता येतील. यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईनचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत.पहा व्हिडिओ.
ठाण्यातील अनिता किएशनमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक डिझाईनचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. मागील २९ वर्षांपासून अनिता हलव्याच्या दागिन्यांचा कारखाना चालवत आहेत. त्यांची मुलं आणि त्यांच्याकडे असलेल्या मदतनीसांची मदत घेऊन त्यात हलव्याचे सुंदर दागिने बनवतात. फॅशनच्या युगात पारंपरिक दागिन्यांमध्ये अनेक नवनवीन बदल होताना दिसून येत आहेत, त्याप्रमाणेच हलव्याच्या दागिन्यांमध्ये बदल होत आहेत. अनेकांना मिनिमल दागिने घालायला खूप जास्त आवडतात. त्यांच्याकडे हलव्याच्या मिनिमल दागिन्यांमध्ये खूप जास्त ऑप्शन उपलब्ध आहेत. हलव्याच्या दागिन्यांनासुद्धा मॉर्डन टच देण्यात आला आहे. त्यामध्ये डायमंड आणि हलव्याचा वापर करून बनवलेला सुंदर हार तुम्ही खरेदी करू शकता.
Makar Sankranti 2025: मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका
काळ्या रंगाच्या साडीला मॉडर्न आणि हटके लुक देण्यासाठी तुम्ही हलव्याचा वापर करून बनवलेला सुंदर चोकर अनिता क्रिएशन यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्याकडे केवळ महिलांसाठीच नाहीतर लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणारे सुंदर सुंदर नाजूक दागिने सुद्धा उपलब्ध आहेत. हलव्याच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या राणी हार, तीन पदरी हार इत्यादी अनेक वेगवेगळ्या डिझाईन सहज मिळतील. त्यांच्याकडून तुम्ही सिंगल दागिने सुद्धा खरेदी करू शकता. त्यांच्याकडे ८०० रुपयांपासून हलव्याच्या सुंदर दागिने उपलब्ध आहेत. अनिता क्रिएशनमध्ये हलव्याचे दागिने तुमच्या आवडीनुसार कस्टमायझेशन करून मिळतात. तुम्हाला सुद्धायेणाऱ्या मकरसंक्रमितीनिमित्त हलव्याचे सुंदर सुंदर दागिने हवे असतील तर ठाण्यातील अनिता क्रिएशनला नक्की भेट द्या.
अनिता क्रिएशन पत्ता: ७०, नाईक हाऊस, राघोबा शंकर मार्ग, चेंदणी, ठाणे (प)
मोबाईल नंबर: ७७३८७६०३९१






