ठाण्यात आलं आहे मकरसंक्रांत स्पेशल एक्सिबिशन!
मकरसंक्रांत सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण देशभरात संक्रात मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. सणावाराच्या दिवसांमध्ये नवनवीन वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. साड्या, कुर्ते, दागिने, चप्पल इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी एकतर बाजारात जाऊन केली जाते किंवा ऑनलाईन सर्व वस्तू खरेदी केल्या जातात. पण ऑनलाईन खरेदी करताना वस्तू व्यवस्थित हात लावून बघता येत नाही. याशिवाय ऑनलाईन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. त्यामुळे कायमच बाजारात किंवा दुकानात जाणून खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. याशिवाय सणावाराच्या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे एक्सिबिशनसुद्धा असतात. एक्सिबिशनमध्ये एकदम हटके आणि युनिक कलेक्शन तुम्ही खरेदी करू शकता. चला तर जाणून घेऊया मकरसंक्रांतीनिमित्त कुठे कुठे एक्झिबिशन आहेत आणि त्या एक्झिबिशनमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींचे तुम्हाला खरेदी करता येतील.(फोटो सौजन्य – navarashtra)
आराध्य इवेन्स्टस प्रस्तुत ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये मकर संक्रांतीनिमिताचे स्पेशल एक्सिबिशन आहे. हे एक्सिबिशन ९, १०, ११ पर्यंत असून सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत असेल. या एक्सिबिशनमध्ये तुम्हाला अनेक हटके आणि पारंपरिक लुक देण्याऱ्या साड्या, कुर्ती, दागिने इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतील. दरवर्षी आराध्य इवेन्स्टसे मकर संक्रांतीनिमितचे एक्सिबिशन असते. या एक्सिबिशनमध्ये K२ फॅशन या मराठमोळ्या ब्रँडच्या साड्यांचा स्टोल आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही मकरसंक्रांतीसाठी लागणारी काळी साडी, त्यावर हटके ब्लाऊज खरेदी करू शकता. त्यांच्याकडे अस्सल खणाच्या हॅन्डलूम साड्या सुद्धा उपलब्ध आहेत. K२ फॅशन या ब्रँडच्या साड्या अनेक मराठी अभिनेत्रींसुद्धा परिधान केल्या आहेत. कामाच्या धावपळीमध्ये एक्सिबिशनला जाणे शक्य न झाल्यास तुम्ही K२ फॅशन या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुद्धा सुंदर साड्यांची खरेदी करू शकता.
एक्सिबिशनमध्ये तुम्हाला युनिक आणि हँडमेड दागिन्यांचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल. यामध्ये मराठमोळे दागीने,नथ,लहान मुलांचे कपडे, हलव्याचे दागीने, संक्रांतीसाठी लागणारे दागिने, मसाले, संक्रांतीच्या सजावटीचे साहित्य वेगवेगळ्या स्टोलवर मिळेल. यासोबतच तिथे मुलांसाठी कपडे, भेटवस्तू देण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, लाडू, बिस्कीट इत्यादी अनेक गोष्टी तुम्हाला एक्सिबिशन मिळतील. वेगवेगळ्या साड्या नेसण्याची आवड असल्यास तुम्ही खण, हँड प्रिंटेड साड्या, हातांनी बनवलेल्या अशा अनेक गोष्टी तुम्हाला एक्सिबिशनमध्ये खरेदी करता येतील.
Makar Sankranti 2025: मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका
ठाण्याव्यतिरिक्त तुम्ही स्काउट हॉल, शिवाजी पार्क, दादर, कोकणस्थ प्रदर्शन, गडकरी रंगायतन ठाणे, भाटिया हॉल, बोरिवली (पश्चिम) इत्यादी ठिकाणी सुद्धा एक्सिबिशन भरले आहेत. एक्सिबिशनमध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या वस्तूंची, कपड्यांची, हॅण्डमेड वस्तूंची खरेदी करू शकता.एक्सिबिशनमध्ये अगदी युनिक आणि हटके साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळतात. त्यामुळे ठाण्यातील आराध्य एक्सिबिशनला नक्की भेट द्या.






