Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kangaroo Care मुळे बाळाच्या विकासात मदत, Skin To Skin कॉन्टॅक्ट किती गरजेचा

बाळाचा जन्म झाल्यानंतर आई आणि बाळामध्ये त्वचेचा संपर्क किती महत्त्वाचा आहे? बाळाच्या विकासात याचा किती मोठा सहभाग असतो याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आपणही जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 07, 2025 | 05:02 PM
कांगारू केअर म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)

कांगारू केअर म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • कांगारू केअर म्हणजे नक्की काय असते
  • नवजात बाळासाठी कांगारू केअर किती महत्त्वाचे
  • तज्ज्ञांनी सांगितले कांगारू केअरचे महत्त्व

कांगारु मदर केअर म्हणजे प्रसुतीनंतर आई आपल्या बाळाला कांगारू प्रमाणे आपल्या छातीजवळ ठेवते. या काळात आई आपल्या मुलाची पूर्ण काळजी घेते. वैद्यकीय भाषेत याला ‘स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट’ (skin to skin contact) असे म्हणतात. हे नवजात बाळाचे संरक्षण करते. ‘कांगारू केअर’ पद्धती अंतर्गत आई बाळाला जास्त काळ स्तनपान करू शकते. त्याच वेळी, बाळही स्तनपान करण्यास शिकते. 

यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा पूर्ण विकास होतो. यासोबतच मुलाचे विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते. डॉ. अनुषा राव, नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, औंध, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. 

कांगारू केअर म्हणजे काय?

यामध्ये बाळाला त्याच्या पालकांच्या उघड्या छातीशी घट्ट कवटाळून ठेवले जाते, अशाप्रकारे पालकांच्या त्वचेशी बाळाच्या त्वचेचा थेट संपर्क होत राहतो, सर्व नवजात बाळांच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. अकाली तसेच सामान्य प्रसूती होऊन जन्मलेल्या बाळांच्या तब्येतीची नीट काळजी घेण्यासाठी कांगारू केअर हे तंत्र उपयुक्त ठरते. बाळाची नीट काळजी घेण्याचा आणि बाळासोबत आपले बंध निर्माण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. या पद्धतीचा वापर करून शुश्रूषा करण्यात आलेल्या बाळांची पालकांसोबत खूप जास्त जवळीक निर्माण होते.

बाळाला मालिश करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

कशी आहे पद्धत?

कांगारू केअर ही नवजात बाळांची काळजी घेण्याची एक विशेष पद्धत आहे, विशेषतः जे अकाली जन्माला आले आहे किंवा ज्यांचे जन्मतः वजन कमी आहे अशा बाळांमा कांगारू केअरमध्ये आईचा शरीरस्पर्श बाळाला नैसर्गिक उब देतो, ज्यामुळे त्याच्या शरीराचे तापमान स्थिर राहते आणि हृदय व श्वसन प्रणाली सुधारते. ही पद्धत संसर्गाचा धोका कमी करते आणि बाळ लवकर वाढते. पद्धतीमुळे आईच्या स्तनातील दूधप्रवाह वाढतो आणि बाळाला अधिक वेळ स्तनपान करता येते. यामुळे बाळाला पोषण मिळतं आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

कांगारू केअर दरम्यान काय होते?

कांगारु केअरमध्ये बाळाला आईच्या छातीशी घट्ट चिकटवून ठेवले जाते, अगदी कांगारूच्या पिशवी सारखे. यामध्ये बाळाला सरळ स्थितीत, तुमच्या उघड्या छातीवर, फक्त डायपर आणि डोक्यावर टोपी घालून ठेवतात. त्यानंतर बाळाला वरून उबदार ब्लँकेट ने झाकले जाते. आईच्या त्वचेशी येणारा हा संपर्क बाळाला गर्भाशयाबाहेरील जीवनाशी जुळवून घेण्यास मदत करतो. अकाली जन्मलेले, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरिता, श्वासोच्छ्वास आणि आहार यासारख्या अनेक आरोग्य समस्यांशी झुंजणाऱ्या बाळांकरिता हे एक वरदान ठरते. कांगारू केअर हे बाळामध्ये उबदारपणा, आराम आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करते.

कांगारू केअर बाळाशी बंध निर्माण करण्यास मदत करते, आईच्या दुधाचे उत्पादन वाढवते आणि बाळ आणि पालक दोघांमधील ताण कमी करते. हे समजून घ्या की कांगारू केअरमध्ये येणाऱ्या त्वचेच्या संपर्काद्वारे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन सारख्या संप्रेरकांना उत्तेजित करून आईच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यास मदत होते. यामुळे स्तनपान करणे देखील सोपे होते, कारण अशा स्थितीत बाळ स्तनपान चांगल्या प्रकारे करतात आणि त्यांना अधिक प्रभावीपणे दूध पाजता येते. पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत कांगारू मदर केअर हे स्तनपान लवकर सुरू करण्यास प्रोत्साहन देते. म्हणून, कांगारू केअर बाळांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

World Breastfeeding Week: नवजात बालकांसाठी स्तनपान का महत्त्वाचे, आई-बाळाची पहिली भेट

कांगारू इतर फायदे कोणते? 

  • बाळाच्या हृदयाचे ठोके, तापमान आणि श्वासोच्छवासाचे नियमन करण्यास मदत होते
  • चांगली झोप आणि जलद वजन वाढण्यास प्रोत्साहन देते
  • बाळ आणि पालकांमधील भावनिक बंध मजबूत करते
  • संसर्गाचा धोका कमी करता येतो
  • बाळाचे रडणे कमी होते आणि बाळ शांत होते.

नवजात आईने या टिप्सचे पालन करा

  • आईने कमीत कमी आवाज आणि लक्ष विचलित न करणारी शांत, स्वच्छ जागा निवडणे गरजेचे आहे
  • हात स्वच्छ धुवा आणि बाळाच्या शरीरावर ओरखडे येतील शकतील असे कोणतेही दागिने घालू नका
  • समोरच्या दिशेने उघडता येईल असा टॉप किंवा हॉस्पिटलचा गाऊन घाला जेणेकरुन बाळाच्या त्वचेचा आईच्या त्वचेशी संपर्क साधता येईल
  • तुमच्या बाळाला तुमच्या उघड्या छातीवर सरळ धरा. डोके एका बाजूला वळलेले असेल याची खात्री करा
  • दोघांनाही उबदार ठेवण्यासाठी मऊ ब्लँकेट किंवा स्वच्छ कपडाने झाकून घ्या
  • कमीत कमी एक तास या स्थितीत रहा आणि दिवसभरात शक्य तितक्या वेळा ही क्रिया करा

तुमच्या बाळाशी हळूवारपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा आवाज त्यांना शांत करण्यास मदत करेल. म्हणून, लक्षात ठेवा, दररोज कांगारू केअरचा सराव करून, तुम्ही नवजात बाळाच्या विकासासाठी प्रयत्न करा.

FAQs (संबंधित प्रश्न) 

१. कांगारू केअर कधी करावे?

बाळाचा जन्म झाल्यावर आई आणि वडील दोघांनीही कांगारू केअर करणे गरजेचे आहे

२. दिवसातून किती तास कांगारू केअर करावे?

दिवसातून साधारण १ तास कांगारू केअर करणे गरजेचे आहे

Web Title: Kangaroo care helps in baby s development how important is skin to skin contact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • newborn baby
  • parenting tips

संबंधित बातम्या

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
1

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
2

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर
3

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी
4

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.