राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड 'कांजी वडे' कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!
भारतात असंख्य राज्य वसले आहेत. प्रत्येक राज्याची आपली अशी खास खाद्यसंस्कृती असते ज्यात काही अनोखे आणि चवदार पदार्थ फेमस असतात. आज आम्ही तुमच्यासाठी राजस्थानचा एक खास आणि पारंपरिक पदार्थ घेऊन आलो आहोत ज्याची चव तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. या पदार्थाचे नाव आहे कांजी वडा! हा राजस्थानचा एक फेमस स्ट्रीट फूड आहे जो चवीला फार अप्रतिम लागतो.
जेवणासाठीचा मसालेदार मेन्यू! घरी बनवून तर पहा पंजाबी स्टाईल चमचमीत छोले भटुरे
राजस्थान म्हटले की तिथली चविष्ट आणि अनोखी स्ट्रीट फूड लगेच डोळ्यासमोर येते. त्यातीलच एक खास आणि पारंपरिक डिश म्हणजे कांजी वडे. उन्हाळ्यात किंवा सणासुदीच्या वेळी राजस्थानात हे खास करून खाल्ले जाते. कांजी म्हणजे मसाल्याच्या पाण्यात बनवलेले आंबट-तिखट सरबत आणि वडे म्हणजे डाळीचे तळून केलेले गोळे. हे पचायला हलके, चवीला आंबट-तिखट आणि तोंडाला लज्जत आणणारे असते. पचन सुधारण्यासाठी व उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून हे खास करून खाल्ले जाते. राजस्थानातील रस्त्यावर मिळणारे हे कांजी वडे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. चला जाणून घेऊया याची एक सोपी रेसिपी.
कांजीसाठी :
वड्यांसाठी :
कांजी वडा किती काळ साठवता येईल?
खोलीच्या तपमानावर, वडा कांजीत घातल्यानंतर २ दिवसांपर्यंत साठवता येईल.
यात पिवळ्या रंगाऐवजी मोहरी पावडर ऐवजी, काळी मोहरी वापरू शकतो का?
हो, ६ कप पाण्यासाठी फक्त १ टेबलस्पून वापरा.