(फोटो सौजन्य : Britannia Cheese )
गणेशोत्सव म्हटलं की मोदक हा नैवेद्याचा अविभाज्य भाग आहे. मोदक हे मिष्टान्न गणपतीला फार प्रिय आहेत असे मानले जाते ज्यामुळे त्याच्या आगमनावेळी मोदकांचा खास प्रसाद अर्पण केला जातो. पारंपरिक उकडीचे मोदक, तळलेले मोदक तर आपण नेहमीच करतो. पण आजच्या काळात नवीन चव आणि आकर्षक प्रेझेंटेशनमुळे मुलं-बालगोपाळही मोदक खाण्यासाठी उत्सुक असतात. म्हणूनच या वेळेस आपण गणपतीसाठी पारंपरिकतेसोबत आधुनिकता एकत्र करून खास रेड व्हेलवेट मोदक तयार करूया.
रेड वेलवेट केक तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. हा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा. हा फ्लेवर फक्त चावीलाच चांगला लागत नाही तर दिसायलाही फार आकर्षक वाटतो. रेड व्हेलवेटचा सुंदर लाल रंग आणि क्रीम चीज फिलिंगचा मऊ गोडवा हे मोदक एकदम रिच, सणासुदीला शोभतील असे बनवतात. आम्हाला खात्री आहे की तुम्ही बनवलेले हे हटके मोदक गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील. चला जाणून घेऊया याची रेसिपी!
बाहेरील आवरणासाठी (रेड व्हेलवेट मिश्रण)
मोदक काय आहे?
मोदक हा गणपतीच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिकपणे तो तांदळाच्या पिठापासून आणि नारळ-गुळाच्या सरणाने तयार केला जातो पण आताच्या काळात अनेक वेगवेगळ्या प्रकारे मोदक तयार केले जाते. ज्यात मावा मोदक, चॉकलेट मोदक यांचा समावेश आहे.
गणेश चतुर्थीच्या काळात मोदक का महत्त्वाचा असतो?
मोदक हा गणपतीचा आवडता गोड पदार्थ मानला जातो आणि तो त्यांना उत्सवाच्या वेळी प्रसाद म्हणून अर्पण केला जातो.






