
किडनी स्टोन समस्या, कारणे, लक्षणे आणि उपाय (फोटो सौजन्य - iStock)
तापमानात घट झाल्याने २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये मुतखड्याच्या समस्येत वाढ होऊ लागली आहे. एकेकाळी वयोवृद्ध व्यक्तींचा आजार मानला जाणारा मूतखडा हा आता तरुणांमध्ये सामान्यपणे आढळून येत आहे. मूत्रामध्ये खनिजे आणि क्षार मोठ्या प्रमाणात असतात. लघवीतील खनिजे आणि क्षारांची पातळी वाढते तेव्हा हे स्फटिक एकत्र होऊन दगडांचे रूप घेतात. कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अॅसिडपासून तयार झालेले हे खडे मूत्रमार्गात अडथळा आणतात, ज्यामुळे वेळीच उपचार न केल्यास तीव्र वेदना, संसर्ग किंवा मूत्रपिंडाचे नुकसान होते. डॉ. पवन रहांगडाले, युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
किडनी स्टोन कारणे कोणती?
पाणी कमी पिणे, आहारातील मीठाचे वाढलेले प्रमाण, आहारातील प्रथिनांचे वाढते प्रमाण, चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचे मोठ्या प्रमाणातील सेवन आणि बैठी जीवनशैली हे मूतखड्यासारख्या समस्येस कारणीभूत ठरतात. जास्त वेळ बसून राहणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे देखील मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत बिघाड निर्माण होतो. हिवाळ्यातील निर्जलीकरणामुळे देखील मूत्र अधिक आम्लयुक्त होते, ज्यामुळे मूत्रपिंडातील खड्यांचाधोका वाढतो.
लघवी करताना जळजळ होते? किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन
किडनी स्टोन होण्याची लक्षणे
पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना होणे, लघवी करताना जळजळ, लघवीवाटे रक्त येणे, मळमळणे किंवा वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे. जर मूत्रपिंडातील खड्यांवर योग्य वेळी उपचार केले नाहीत त्यांचा आकारा वाढू लागतो आणि मूत्रमार्गात संसर्ग आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ लागते.
किडनी स्टोन उपाय
उपचार हा त्यांच्या आकारावर आणि मुतखड्याच्या स्थानानुसार ठरविला जातो. लहान खडे बहुतेकदा जास्त द्रव पदार्थांचे सेवन आणि वेदना कमी करून नैसर्गिकरित्या निघून जातात. मोठ्या खड्यांन्ना लिथोट्रिप्सी (शॉक वेव्ह थेरपी) किंवा एंडोस्कोपिक पद्धतीने काढले जाते. गंभीर प्रकरणांमध्ये, मूत्रपिंडाचे कार्य पुनर्संचयित करण्यासाठी मिनीमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.
मुतखडा टाळण्यासाठी टिप्स