किडनी स्टोनवर घरगुती उपाय
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, शरीरात निर्माण झालेला पोषण घटकांचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. पण किडनीचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. शरीरात होणाऱ्या या बदलांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र असे केल्यामुळे छोटे आजार आणखीनच गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता असते. किडनी स्टोनचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात असह्य वेदना होऊ लागतात. किडनी स्टोनचा आकार लहान असल्यानंतर घरगुती उपचार करून बरा करता येतो, मात्र या स्टोनचा आकार वाढल्यानंतर सर्जरी करावी लागते.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात ‘या’ लोकांनी चुकूनही करू नये उसाच्या रसाचे सेवन, अन्यथा शरीरावर होतील गंभीर दुष्परिणाम
किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात दुखणे, तीव्र वेदना, लघवीमध्ये जळजळ, पाठ दुखणे, ओटीपोटात दुखणे, लघवीतून रक्त येणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावे. किडनी स्टोन झालेल्या व्यक्तीला पुन्हा नव्याने स्टोन होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे किडनी स्टोन कायमचा लघवीवाटे पडून जाईल.
किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात आणि पाठीमध्ये असह्य वेदना होण्यास सुरुवात होते. अशावेळी जवसाच्या बियांचे पाणी प्यावे. जवसाच्या बियांचे पाणी प्यायल्यामुळे किडनी स्टोन लघवीवाटे निघून जाईल. जवसाच्या बियांचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, २ ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात जवसाच्या बिया टाकून उकळवून घ्या. तयार केलेले पाणी गाळून झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून दिवसभरात जमेल तेवढ्या वेळा प्यावे. स्टोन पडून गेल्यानंतर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही पाण्याचे सेवन करू शकता. जवस बियांच्या पाण्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होईल.
कुळीथ दाणे किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कुळीथ दाण्यांचे सेवन करावे. या दाण्यांच्या सेवनामुळे शरीराला इतरही फायदे होतील. यामध्ये असलेले कॅल्शिअम, ऑक्सालेट किडनी स्टोनचा धोका कमी करतात. कुळीथ दाण्यांचा वापर करून तुम्ही सूप, भाजी, आमटी इत्यादी पदार्थ बनवले जातात.
दैनंदिन आहारात चुकूनही करू नका ‘या’ फळांचे सेवन! पोटावर वाढलेला चरबीचा घेर होईल कमी, वजनात होईल घट
किडनी स्टोन होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत. आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कमी पाणी पिणे, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, जास्त वेळ लघवी थांबवून ठेवणे, वाढलेले वजन, मधुमेह किंवा अतिमीठाचे सेवन केल्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.