Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Corn Chila कधी खाल्ला आहे का? यंदाच्या पावसाळ्यात हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा

पावसाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात मके येतात अशात तुम्ही नाश्त्यासाठी यापासून चवदार आणि आरोग्याला पौष्टिक ठरणारा मक्याचा चिला तयार करू शकता. हा चिला फार झटपट तयार होतो आणि चवीलाही फार छान लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2025 | 10:55 AM
Corn Chila कधी खाल्ला आहे का? यंदाच्या पावसाळ्यात हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा

Corn Chila कधी खाल्ला आहे का? यंदाच्या पावसाळ्यात हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे, या ऋतूत बाजारात मोठ्या प्रमाणात मके विक्रीसाठी येत असतात. मक्याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचेही ठरते अशात तुम्ही यापासून वेगवगेळे असे पदार्थ बनवून याचे सेवन करू शकता. मक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते डोळ्यांसाठी, पचनक्रियेसाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी चांगले आहे. तसेच, ते वजन कमी करण्यास आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा डोसा, लहान मुलं आवडीने खातील

नेहमीप्रमाणे मक्याला उकडून किंवा भाजून खाण्याऐवजी तुम्ही यापासून टेस्टी असा चिला तयार करू शकता. कॉर्न चिला ही एक झटपट आणि चविष्ट डिश आहे जी सकाळच्या न्याहारीसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे. मक्याच्या दाण्यांची गोडसर चव, मसाल्यांसोबत मिळून एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय बनतो. ही रेसिपी झटपट तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • उकडलेले मका दाणे – १ कप
  • बेसन (हरभऱ्याचं पीठ) – १/२ कप
  • बारीक चिरलेला कांदा – १
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – १
  • हळद – १/४ टीस्पून
  • लाल तिखट – १/२ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – चिलासाठी
संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा मखाणा रायता, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ

कृती

  • मक्याचा चिला तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात उकडलेले मका दाणे घालून थोडे बारीक वाटून घ्या (पूर्ण पेस्ट करू नका, थोडी भरडच राहू द्या).
  • यांनतर एका मोठ्या भांड्यात वाटलेले मका दाणे, बेसन, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ घालून चांगले मिसळा.
  • आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून डोश्याच्या पिठासारखे बॅटर तयार करा. ते फार घट्ट किंवा फार पातळ नसावे.
  • नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घाला.
  • आता एक पळी भर बॅटर तव्यावर ओता आणि हलक्या हाताने पसरवा. वरून थोडे तेल सोडा.
  • एक बाजू चांगली खरपूस भाजली की पलटून दुसरी बाजू देखील भाजा.
  • गरमागरम कॉर्न चिला टोमॅटो सॉस, हिरव्या चटणी किंवा दहीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तुम्ही यात किसलेले गाजर, ढोबळी मिरची, स्प्रिंग ऑनियन यांसारख्या भाज्याही घालू शकता.

Web Title: Know how to make corn chila at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet corn

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.