संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा मखाणा रायता
पोषक घटकांचा खजिना म्हणजे मखाणा. मखाणा खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर तुम्ही मखाणा खाऊ शकता. वाढलेले वजन कमी करताना आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. अशावेळी कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याऐवजी मखाणा खावा. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात मखाणा रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मखाणा रायता शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करेल. दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया निरोगी ठेवतात. मळाच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चला तर जाणून घेऊया मखाणा रायता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यातील थंडगार वातावरणात झटपट बनवा हिरव्या मुगाचं कढण, नोट करा पारंपरिक पदार्थ