Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

तंदुरी चिकन हा एक स्टार्टरचा प्रकार आहे ज्याला पाहतच सर्व मांसाहारी प्रेमींच्या तोंडात पाणी सुटतं. सर्वांच्या आवडीची ही रेसिपी तुम्ही घरीच तयार करू शकता आणि तेही कोणत्या तंदूरशिवाय...

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 05, 2025 | 10:30 AM
तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

Follow Us
Close
Follow Us:

रविवारचा दिवस म्हटला की अनेकांच्या घरी नॉन व्हेजचा बेत बनतोच बनतो. आज आम्ही तुमच्यासाठी रविवारसाठीची एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्हालाच काय तर तुमच्या कुटुंबालाही फार आवडेल. आपल्या आजच्या रेसिपीचे नाव आहे तंदुरी चिकन! तंदुरी चिकन हे भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक राजेशाही आणि लोकप्रिय पक्वान्न आहे. नावातच त्याची ओळख दडलेली आहे — “तंदूर” म्हणजे मातीचा ओव्हन, ज्यामध्ये मसालेदार चिकन हळूहळू भाजले जाते. या प्रक्रियेमुळे चिकनला एक खास धुरकट सुगंध आणि चव मिळते, जी इतर कोणत्याही प्रकारच्या भाजणीमध्ये मिळत नाही. दिल्ली, पंजाब आणि उत्तर भारतात या डिशचा जन्म झाला असून आज ही रेसिपी जगभरात प्रसिद्ध आहे.

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

कोणत्याही पार्टीत, फंक्शनमध्ये किंवा खास डिनरमध्ये तंदुरी चिकन ही स्टार डिश मानली जाते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असलेले हे चिकन, मसाल्यांच्या सुगंधाने मन मोहून टाकते. अनेकदा आपण बाहेर हॉटेलमध्ये खायला गेलो की या पदार्थाचा आस्वाद लुटतो मात्र घरी बनवल्यास कमी किमतीत तुम्ही अधिकाधिक तंदुरी चिकनचा आस्वाद लुटू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • चिकन – 500 ग्रॅम (लेग पीस किंवा मध्यम तुकडे)
  • दही – 1 कप
  • आले-लसूण पेस्ट – 2 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • धणेपूड – 1 टीस्पून
  • जिरेपूड – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • लिंबाचा रस – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 टेबलस्पून
  • बटर – 1 टेबलस्पून (ब्रशिंगसाठी)
  • कसुरी मेथी – ½ टीस्पून (ऐच्छिक)
  • फूड कलर – चिमूटभर (लाल किंवा केशरी, हवे असल्यास)

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

कृती

  • तंदुरी चिकन तयार करण्यासाठी सर्वप्रथम चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यावर हलक्या हाताने चिरा करा. यामुळे मसाला आतपर्यंत जाईल.
  • लिंबाचा रस, मीठ आणि आले-लसूण पेस्ट लावून चिकन 15-20 मिनिटे बाजूला ठेवा.
  • एका भांड्यात दही, लाल तिखट, हळद, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, तेल, कसुरी मेथी आणि फूड कलर घालून मिश्रण तयार करा. हे मसालेदार मिश्रण चिकनवर चांगले लावा.
  • हे मसाले लावलेले चिकन किमान 4 ते 6 तास फ्रिजमध्ये ठेवा. जास्त वेळ ठेवल्यास चव अधिक छान लागते.
  • पारंपरिक तंदूरमध्ये भाजता येते, पण घरच्या ओव्हन किंवा गॅस ग्रिलवरही करता येते. 200°C तापमानावर ओव्हन गरम करून चिकन 25-30 मिनिटे भाजा. मध्येच बटरने ब्रश करा.
  • जर तुम्हाला खास “धुरकट” चव हवी असेल, तर गरम कोळशावर थोडं तूप टाकून झाकण ठेवा आणि धुरात काही मिनिटे चिकन ठेवा.
  • गरमागरम तंदुरी चिकन हिरव्या चटणी, कांद्याच्या रिंग आणि लिंबाच्या फोडींसह सर्व्ह करा.
  • दही जाडसर आणि ताजे असावे.
  • चिकन जितके जास्त वेळ मॅरिनेट कराल, तितके ते मऊ आणि स्वादिष्ट बनेल.
  • जर ओव्हन नसेल, तर तवा किंवा एअर फ्रायर वापरू शकता.

Web Title: Know how to make hotel style tandoori chicken at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव
2

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, १५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
3

दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, १५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

Kojagari Special: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला, नोट करून घ्या रेसिपी
4

Kojagari Special: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.