Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हरच्या आजारांचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या ठरतात उपयुक्त, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

लिव्हरच्या आजारांची लागण झाल्यानंतर पोटात वेदना होणे, त्वचेचा रंग बदलणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे वारंवार पोटात वेदना होत असतील तर लिव्हरसबंधित या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 18, 2026 | 03:30 PM
लिव्हरच्या आजारांचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या ठरतात उपयुक्त, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

लिव्हरच्या आजारांचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या ठरतात उपयुक्त, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:

शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकणे, रक्त शुद्ध करणे, शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल तयार करणे, पित्त तयार करणे इत्यादी ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण जीवनशैलीतील बदल आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडते. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून न जाता शरीरात तशीच साचून राहते. यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस किंवा लिव्हरसबंधित गंभीर आजारांची लागण होते. बऱ्याचदा शरीराला झालेल्या आजारांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. दुर्लक्ष केल्यामुळे आजार वाढतात आणि संपूर्ण आरोग्य कायमचे बिघडून जाते. लिव्हरच्या आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लिव्हरला सूज येणे, पोटात वेदना, डोळे पिवळे पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पण कालातंराने लक्षणांमध्ये वाढ होते आणि आरोग्य बिघडते. चला तर जाणून घेऊया लिव्हरच्या समस्या उद्भवल्यानंतर कोणत्या चाचण्या केल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)

एका जागी पुतळा बनवणारे Zombie Drug नेमके आले कुठून? तरुणाईला वेड लावलेल्या झॉम्बी ड्रग्जचे शरीरावर होतात घातक परिणाम

लिव्हर टेस्ट म्हणजे काय?

लिव्हरसबंधित आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल जाणवू लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास लिव्हरसबंधित आजाराची लक्षणे दिसू लागतात. लिव्हरची टेस्ट केल्यानंतर लिव्हरमध्ये किती प्रमाणात चरबी जमा आहे, लिव्हरचा आकार कसा आहे आणि लिव्हरमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन विविध चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. लिव्हरच्या आजाराची लागण झाल्यानंतर रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात ALT, AST , ALP, बिलीरुबिन, अल्ब्युमिन इत्यादी विविध तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय फॅटी लिव्हरची चाचणी सुद्धा केली जाते. यामुळे लिव्हरमध्ये किती प्रमाणात फॅट जमा झाले इत्यादी गोष्टी समजणे सोपे होऊन जाते.

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत कडुलिंबाची पाने! शक्तिशाली पानांचे त्वचा केसांसह संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे

लिव्हर डिटॉक्स मागील खरे सत्य?

डॉक्टरांच्या मते, लिव्हर डिटॉक्स करणे ही अतिशय चुकीची संकल्पना आहे. लिव्हर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैली व्यवस्थित असणे फार आवश्यक आहे. वजन नियंत्रणात ठेवणे, हेल्दी आणि संतुलित आहार घेतल्यास लिव्हर निरोगी राहील. बाजारात लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध पेय आणि सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला जातो. पण अशा कोणत्याही गोष्टींना बळी न पडता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. पूर्वीच्या काळी सुद्धा लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेतला जायचा. लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन, आल्याचा चहा इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश असतो. त्यामुळे लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणतेही डिटॉक्स घेण्याची गरज नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हरच्या आजारांचे निदान कसे केले जाते?

    Ans: लिव्हरच्या आजारांचे निदान रक्त चाचण्या (LFT), अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन, MRI आणि बायोप्सी यांच्या मदतीने केले जाते.

  • Que: लिव्हरच्या आजारांची लक्षणे कोणती असतात?

    Ans: थकवा, भूक न लागणे, त्वचा पिवळी होणे (जॉन्डिस), पोटात सूज, उलट्या, वजन घटणे ही सामान्य लक्षणे आहेत.

  • Que: लिव्हर टेस्ट केव्हा करावी?

    Ans: जर पोटात त्रास, थकवा, जॉन्डिसची लक्षणे किंवा डॉक्टरांचा सल्ला असेल तर लिव्हर टेस्ट करावी.

Web Title: Know the detailed information given by the experts which tests are useful in diagnosing liver diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • Liver
  • liver care

संबंधित बातम्या

चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, घरगुती उपाय करून मिळवा आराम
1

चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, घरगुती उपाय करून मिळवा आराम

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर
2

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.