Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! ‘या’ पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांमध्ये बसेल पीळ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ

दही खाणे आरोग्यासाठी चांगले आहे तितकेच वाईट सुद्धा आहे. त्यामुळे चुकीच्या वेळी दह्याचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी दही खावे? दही खाण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2025 | 11:38 AM
'या' पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांमध्ये बसेल पीळ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ

'या' पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांमध्ये बसेल पीळ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही आणि इतर थंड पदार्थांचे सेवन केले जाते. रोजच्या आहारात दही खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी किंवा पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी दही किंवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. दही खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते. मात्र बऱ्याचदा दही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ले जाते. चुकीच्या पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी दह्याचे सेवन करावे आणि कधी करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कोणत्याही वेळी दही खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतील.(फोटो सौजन्य – istock)

सर्दीला म्हणा गुडबाय! गरम पाण्याची वाफ घेताना पाण्यात टाका ‘हे’ बारीक दाणे, छातीतील कफ होईल मोकळा

कोणत्या वेळी दही खाणे टाळावे?

आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी दही खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. कारण दही अतिशय थंड आणि जाड असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी दही पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो. पचनक्रिया मंदावल्यामुळे दही सहज पचन होत नाही.दही व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अजीर्ण, गॅस, ऍसिडिटी आणि ब्लोटिंग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्याशिवाय रात्रीच्या वेळी दही खाल्यामुळे सायनस, सर्दी किंवा श्वसनासंबंधी अ‍ॅलर्जी इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री अजिबात दही खाऊ नये.

दही खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

दही खाल्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या वेळी थोडस दही खाल्यास शरीर कायमच हेल्दी राहील. दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड, प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचेवरील नैसगरिक चमक कायमच टिकवून ठेवण्यासाठी दही खावे. नियमित अर्धा वाटी किंवा वाटीभर दही खाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होईल.

दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

दही खाण्याची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ किंवा दुपार. सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या आहारात दह्याचे सेवन करावे. सकाळी नाश्त्यात दही खाल्यास शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहील आणि संपूर्ण दिवस उत्साहामध्ये जाईल. तसेच दुपारच्या आहारात दही खाल्यास पचनक्रिया मजबूत होते आणि आतड्यांच्या हालचाली सुलभ होतात. तसेच रात्रीच्या वेळी दही खाल्यामुळे पचनक्रियेवर तणाव येतो.

Loose Motion मुळे हैराण झालात? आयुर्वेदिक उपाय ठरेल रामबाण, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितले जंत होतील गायब

दही खाताना कोणत्या चुका करू नये?

  • कोणत्याही गरम अन्नपदार्थांसोबत दह्याचे सेवन अजिबात करू नये. यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.
  • रात्रीच्या वेळी दही खाल्ल्यास सर्दी, खोकला किंवा आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागतात.
  • आयुर्वेदानुसार दही आणि फळे एकत्र खाल्ल्यास पचनक्रिया बिघडते आणि अन्नपदार्थ पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो.
  • दही आणि साखर एकत्र मिक्स करून खाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते.

FAQs (संबंधित प्रश्न)

दही म्हणजे काय?

दही हे दुधापासून बनवलेले एक दुग्धजन्य उत्पादन आहे, ज्यामध्ये दुधातील लैक्टोज जीवाणूंच्या मदतीने लॅक्टिक ऍसिडमध्ये रूपांतरित होते. यामुळे दही आंबट आणि दाट होते.

दही आणि योगर्ट मध्ये काय फरक आहे?

दही आणि योगर्ट दोन्ही दुधापासून बनवलेले असले तरी, त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि वापरल्या जाणार्या जीवाणूंमध्ये फरक असतो. दह्यामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले लॅक्टिक ऍसिड असते, तर योगर्टमध्ये विशिष्ट प्रकारचे जीवाणू (bacteria) वापरले जातात.

दह्यासोबत काय खाऊ नये?

काही पदार्थांसोबत दही खाणे टाळावे कारण त्यामुळे पचनाच्या समस्या येऊ शकतात. उदाहरणार्थ, दही आणि मासे किंवा दही आणि मांस एकत्र खाणे टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Know the right time to eat curd side effects of eating curd how to eat curd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • Benefits for Curd
  • Health Care Tips
  • side effect

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.