Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उभं राहून पाणी पिता? मग थांबा, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते.शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. तसेच चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर त्याचे हानिकारक परिणाम दिसून येतात. त्यामुळे दररोज भरपूर पाणी प्यावे. अनेकांना बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याची सवय असते., पण चुकीची पद्धत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने पाणी कसे प्यावे, याबद्दल सोप्या टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2024 | 10:30 AM
पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी पिण्याची योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:

जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी,निवारा या तीन गोष्टींची मूलभूत गरज असते. पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. एकवेळ माणसाला अन्न मिळाले नाहीतरी चालेल पण पाणी हे हवेच. सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते. शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासू लागल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे रोज भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी दररोज पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. पण चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

पाणी पिण्याची योग्य पद्धत:

बसून पाणी प्या:

नेहमी पाणी पिताना बसून पाणी प्यावे. ऑफिसमध्ये किंवा घरात, इतर ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे पोटात दुखणे किंवा आरोग्यसंबंधित इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आयुर्वेदात सांगितल्यानुसार, उभं राहून पाणी प्यायल्यामुळे शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडून जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

हे देखील वाचा: सतत केस गळून पातळ झाले आहेत? तर ‘हे’ योग नक्की करून पहा

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी पिण्यासाठी काचेचा ग्लास वापरा:

नेहमी पाणी पिण्यासाठी काचेचा ग्लास वापरावा. काहींना बाटलीमधून पाणी पिण्याची सवय असते, पण हे आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. बाटलीने पाणी पिण्याऐवजी ग्लासातून पाणी प्यावे. ग्लासमधून प्यायलेले पाणी शरीरामध्ये हळूहळू जाऊन तहान भागते. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. त्यामुळे नेहमी काचेच्या ग्लासमधून किंवा कोणत्या ग्लासचा वापर करून सीप करत पाणी प्यावे.

हे देखील वाचा: झटपट Collagen बूस्ट करतील ‘हे’ 5 फूड्स, चेहरा नेहमी राहील तरुण

जास्त थंड पाणी पिऊ नये:

नेहमी पाणी पिताना जास्त थंड पाणी पिऊ नये. थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता असते. थंडगार पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे.सतत थंड पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते. शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून नेहमी कोमट किंवा साधे पाणी प्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Know the side effects of drinking water while standing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
1

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
2

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
3

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
4

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.