फोटो सौजन्य: Freepik
कोणाला आपली त्वचा सुंदर व निरोगी राहिलेली आवडणार नाही. परंतु वयानुसार आपल्या त्वचेत बदल होतात जे आपल्याला शरीराला थोडेफार कुरूप सुद्धा बनवतात. त्यामुळेच शरीरात कोलेजनची मात्रा असणे गरजेचे आहे.
कोलेजन हा एक प्रकारचा प्रोटीन आहे, जो त्वचेचा मुख्य बिल्डिंग ब्लॉक आहे आणि त्वचेची रचना, ताकद आणि लवचिकता राखण्यात मदत करतो. त्वचेचा मधला थर असलेल्या डर्मिसमध्ये असलेले कोलेजन स्किन टिशूचे 70-80% भाग बनवते.
कोलेजन त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास आणि त्वचेच्या म्हातारपणाची चिन्हे कमी करण्यास मदत करते. कोलेजन वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असेल.
नट्स आणि बिया
शरीरात नैसर्गिकरित्या कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नट्स आणि बियांचा समावेश करू शकता. हेझलनट्स, बदाम, अक्रोड, सोया, कॅनोला, सूर्यफूल बिया कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात.
टोमॅटो
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले टोमॅटो हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. टोमॅटो कोलेजन उत्पादन वाढवण्यास सुद्धा मदत करते. हे त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते आणि कोलेजन उत्पादन वाढवते.
ॲव्होकॅडो
ॲव्होकॅडो हे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेले फळ आहे. हे फळ आपल्या आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. आरोग्यासोबतच ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्याचा आहारात समावेश केल्याने कोलेजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
आंबट फळं
संत्री, द्राक्षे, लिंबू यांसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असते. तसेच या फळांमुळे कोलेजन शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढते.
पालेभाज्या
पालक आणि ब्रोकोली सारख्या क्लोरोफिलयुक्त भाज्या खाल्ल्याने शरीरात कोलेजनची पातळी वाढते. यामुळे त्वचेची लवचिकता वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.