Malaria झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न करणे ठरेल धोक्याचे!
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे डेंग्यू, डायरियासोबतच मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पावसाळ्यच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरील पदार्थांचे सेवन, दूषित पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. दिल्लीमध्ये मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावर किंवा घराच्या आजूबाजूला डासांची पैदास झाल्यामुळे मलेरियासह इतर आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. बऱ्याचदा सर्दी, खोकला, ताप आल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मलेरिया झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? मलेरिया झाल्यानंतर आरोग्याची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
दिल्लीमध्ये डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २८ जुलैपर्यंत २७७ मलेरिया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील ५ वर्षांमध्ये यंदाच्या वर्षी मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. मलेरिया झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष दिल्यास उपचार करणे अतिशय सोपे होते. पण शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची योग्य काळजी घ्यावी. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर चुकीच्या पदार्थांचे आहारात सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडते. याशिवाय दूषित पाणी आणि घाणीच्या संपर्कात आल्यामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डासांपासून दूर राहणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे परिधान करणे, बेडरूममध्ये मच्छरदानीचा वापर, डास पळवणाऱ्या कॉइल, अगरबत्ती लावा, मोकळ्या जागेत पाणी साचू देऊ नये इत्यादी गोष्टी करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन
मलेरिया म्हणजे काय?
मलेरिया हा एक परजीवी (parasite) मुळे होणारा आजार आहे, जो प्लास्मोडियम (Plasmodium) नावाच्या परजीवीमुळे होतो. हा परजीवी मादी ऍनोफिलीस (Anopheles) डासांच्या चावण्याने माणसांमध्ये पसरतो.
मलेरियाची लक्षणे काय आहेत?
ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, कधीकधी मळमळ आणि उलट्या इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात.