Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात बीटपासून बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स

नियमित एक ग्लासभर बीटचा रस किंवा बीटचा रायता खाल्ल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधरण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया कडक उन्हात बीटपासून कोणते पदार्थ बनवावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 11:42 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात बीटपासून बनवा 'हा' चविष्ट पदार्थ, आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स

कडाक्याच्या उन्हाळ्यात बीटपासून बनवा 'हा' चविष्ट पदार्थ, आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स

Follow Us
Follow Us:

बीट खाण्याचे फायदे?
बीटपासून कोणते पदार्थ बनवावेत?
पचनक्रिया सुधारण्यासाठी काय खावे?

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही थंड पदार्थ खाण्याची इच्छा कायमच होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी विविध पदार्थांचे सेवन केले जाते. थंड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात तात्पुरता थंडावा टिकून राहतो, मात्र पुन्हा एकदा पोटात जळजळ किंवा अपचनाच्या समस्या वाढतात. सततच्या धावपळीमध्ये शरीराकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. सतत काम करत राहिल्यामुळे आणि बैठी जीवनशैली इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. अशावेळी आहारात बदल, भरपूर पाण्याचे सेवन, शरीरास आवश्यक असलेली झोप घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासोबतच आहारात बीटचा सुद्धा समावेश करावा. बीट खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले घटक थकवा, अशक्तपणापासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया उन्हात बीटपासून कोणता पदार्थ बनवावा आणि बीट खाण्याचे गुणकारी फायदे.(फोटो सौजन्य – istock)

बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

आपल्यातील अनेकांना बीट खायला अजिबात आवडत नाही. कारण बीटची चव अतिशय तुरट लागते. पण कच्चे बीट खाण्याऐवजी त्यापासून विविध पदार्थ बनवून खाल्ल्यास बीटची चव आणखीनच सुंदर लागेल. यासाठी बीट स्वच्छ धुवून साल काढा आणि किसून घ्या. किसून घेतलेले बीट वाटीमध्ये घेऊन त्यात आवश्यकतेनुसार दही घालून मिक्स करा आणि चवीनुसार मीठ टाका. तसेच तुमच्या आवडीनुसार तुम्ही रायतामध्ये मसाले सुद्धा टाकू शकता. यामुळे चांगली चव लागेल.

बीट तुम्ही सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी संध्याकाळच्या जेवणात सुद्धा खाऊ शकता. कच्चा बीट किंवा बीटचा रस पिण्यास आवडत नसेल तर बीटची भाजी बनवावी. कच्चा कांदा, ओल्या खोबऱ्याचा किस आणि बीट टाकून बनवलेली भाजी लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील. कोणत्याही वयोगटातील लोक आहारात बीट खाऊ शकता. कडक उन्हाळ्यात बीटचा रायता खाल्ल्यासशरीर सुद्धा हायड्रेट राहण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल. बीट रायताची चव नाही आवडल्यास बीटचा रस शुद्ध बनवून पिऊ शकता.

हृदयविकाराच्या उपचारांमध्येही लिंगभेद? सायन रुग्णालयाच्या आकडेवारीत पुरुष रुग्णांचे वर्चस्व; महिलांमध्ये लक्षणे दुर्लक्षित

बीट खाण्याचे गुणकारी फायदे:

बीटमध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि फायबर इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. महिनाभर नियमित बीटचा रस किंवा कच्चे बीट खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढेल, रक्तदाब नियंत्रणात राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि रक्त शुद्ध होते. आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी बीटचा रस प्यावा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला फायदे होतात. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आणि ॲनिमियासारख्या समस्या दूर करण्यासाठी बीट खावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make this tasty dish from beetroot during hot summers it will detoxify the body along with the elimination of intestinal waste

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • Health Care Tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
1

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
2

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
3

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
4

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.