Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत झोप येते? मग शरीरात असू शकते ‘या’ विटामिनची कमतरता, जास्त झोप आरोग्यासाठी ठरेल घातक

काही लोक दिवसभर झोपून राहिले तरीसुद्ध त्यांची झोप कधीच पूर्ण होत नाही. सतत झोपून राहिल्यामुळे आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. दिवसभर काम करून थकून आल्यानंतर शरीराला झोपेची आवश्यकता असते, पण अतिप्रमाणात झोपल्यामुळे आरोग्य बिघडू लागते.शरीरामध्ये विटामिन सी, विटामिन डी आणि विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत झोप येते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 29, 2024 | 10:23 AM
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे झोप येते

कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे झोप येते

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभर काम करून आल्यानंतर शरीराला रात्रीच्या वेळी विश्रांतीची आवश्यकता असते. दिवसभरातून 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य बिघडू शकते. पण काहींना गरजेपेक्षा जास्त वेळ झोपण्याची सवय असते. दिवसभर झोपून राहिले तरीसुद्ध त्यांची झोप कधीच पूर्ण होत नाही. सतत झोपून राहिल्यामुळे आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. दिवसभर काम करून थकून आल्यानंतर शरीराला झोपेची आवश्यकता असते, पण अतिप्रमाणात झोपल्यामुळे आरोग्य बिघडू लागते. शरीरात विटामिनची कमतरता, पोषण आहाराचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीच्या सवयी अंगीकारून आरोग्य बिघडवण्यापेक्षा योग्य पद्धतीने जीवन जगणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)

सतत झोपून राहिल्यामुळे डोकं दुखणे, शरीरात थकवा जाणवणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. अशा समस्या शरीरामध्ये विटामिनची कमतरता जाणवू लागल्यानंतर उद्भवतात. शरीरात जीवनसत्वांचा अभाव निर्माण झाल्यानंतर जास्त प्रमाणात झोप येऊ लागते. सतत झोपून राहावे, असे वाटू लागते. शरीरातील कमी झालेल्या विटामिनचा परिणाम झोपेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे ज आम्ही तुम्हाला शरीरात कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर झोप येते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नक्की वाचा.

हे देखील वाचा: लाल केळी माहित्येत का? आहारात समाविष्ट केल्यास मिळतात आरोग्यदायी फायदे

कोणत्या विटामिच्या कमतरतेमुळे झोप येते?

शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत झोप येते. शरीरासाठी विटामिन डी आवश्यक आहे. विटामिन डी युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील हाडे आणि स्नायू मजबूत राहतात. डॉक्टरांच्या मते, शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत झोपे येऊ लागते आणि अशक्तपणा जाणवतो. सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही.

विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सुद्धा सतत झोप येणे, अशक्तपणा जाणवणे, हृदयाचे ठोके वाढणं इत्यादी अनेक समस्या जाणवतात. लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि नर्वस सिस्टमसाठी विटामिन बी 12 फार गरजेचे आहे. शरीरातील विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात अंडी, मासे, मांस, बीन्स, नट आणि दूध इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

हे देखील वाचा: साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यात करा ‘या’ पदार्थाचा समावेश, मधुमेह राहील नियंत्रणात

विटामिन सी शरीरासह त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण शरीरात विटामिन सी ची कमतरता निर्माण झाली तर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. तसेच सतत थकवा जाणवणे, स्नायू दुखणे, हाडं दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. विटामिन सी च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, हिरड्यांमधून रक्त येणं, सांधेदुखी आणि त्वचा कोरडी पडणं इत्यादी गंभीर समस्या उद्भवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Know which vitamin you need to have a sound sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 10:23 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं  शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला
1

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम
2

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही
3

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या
4

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.