प्रत्येक ऋतूंमध्ये बाजारात वेगवेगळ्या प्रकारची फळे उपलब्ध असतात. त्यात सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असणारे फळ म्हणजे केळी. आत्तापर्यंत तुम्ही पिवळ्या आणि हिरव्या रंगाची कच्ची केळी पहिली असतील पण बाजारात हल्ली लाल रंगाची केळीसुद्धा उपलब्ध झाली आहे. लाल केळी आरोग्यासाठी पौष्टीक आहेत. भारतीय बाजारातच नाही तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, मेक्सिको आणि अमेरिका इत्यादी अनेक देशांमध्ये लाल रंगाची केळी मिळतात. पिवळ्या रंगाच्या केळ्यांपेक्षा लाल रंगाची केळी अधिक पौष्टिक आणि आरोग्यासाठी गुणकारी आहेत. चला तर जाणून घेऊया लाल केळी खाण्याचे फायदे.(फोटो सौजन्य-istock)
लाल केळ्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
लाल रंगाच्या केळ्यामध्ये बीटा-कॅरटीन आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. तसेच या केळ्याचे सेवन केल्यामुळे प्रजनन क्षमता, शक्ती वाढवण्यास मदत वाढण्यास मदत होते. लाल रंगाच्या केळ्यांमध्ये झिंक आढळून येते.
डोळ्यांचे आरोग्य बिघडल्यास लाल केळ्याचे सेवन करावे. यामुळे डोळ्यांची कमी झालेली दृष्टी सुधारण्यास मदत होते. यामध्ये ल्यूटीन आणि बीटा-कॅरटेनॉयड्सचे प्रमाण जास्त असते.
त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी आहारामध्ये लाल केळ्याचा समावेश करावा. यामध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले विटामिन सी आणि कॅरोटीनॉइड आढळून येते. यामुळे म्हातारी झालेली त्वचा पुन्हा तरुण होण्यास मदत होते.
शरीरामध्ये लोहाची कमतरता जाणवू लागल्यास आहारात लाल केळ्याचा समावेश करावा. यामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट आढळून येतात.
हिमोग्लोबिन आणि लोहाची पातळी वाढवण्यास लाल केळी मदत करतात. तसेच शरीरातील कमी झालेल्या लाल रक्तपेशी वाढतात.