Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

जगभरात मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब हे सर्वाधिक आढळणारे नॉन-कम्युनिकेबल म्हणजेच संसर्गजन्य नसलेले आजार आहेत. विशेषतः तरुणांमध्ये या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तिन्ही आजारांमध्ये परस्पर संबंध आढळतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 03, 2026 | 04:23 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब हे नॉन-कम्युनिकेबल आजार
  • तरुणांमध्ये या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढ
  • जीवनशैली बदल केल्यास आजार मोठ्या प्रमाणात टाळता येतात
Health Tips : जगभरात मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब हे सर्वाधिक आढळणारे नॉन-कम्युनिकेबल म्हणजेच संसर्गजन्य नसलेले आजार आहेत. विशेषतः तरुणांमध्ये या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या तिन्ही आजारांमध्ये परस्पर संबंध मोठ्या प्रमाणात आढळतो, कारण आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि आनुवंशिकता हे समान घटक यामागे कारणीभूत असतात. मात्र, सातत्यपूर्ण आणि जाणीवपूर्वक जीवनशैली बदल केल्यास हे आजार मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. याबाबत अधिक माहिती BDR Pharmaceuticals चे टेक्निकल डायरेक्टर डॉ. Aravind Badiger यांनी दिली.

Relationship Tips : तुमचा जोडीदार घटस्फोटाचा विचार तर करत नाही ना? या 11 संकेतांद्वारे ओळखा, नाहीतर …

संतुलित आणि पोषक आहाराने सुरुवात

या तिन्ही आजारांच्या प्रतिबंधासाठी आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जास्त कार्बोहायड्रेट, साखर, चरबी आणि मीठ असलेला आहार हा मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाबाचा प्रमुख कारण ठरतो. त्याऐवजी धान्ये, फळे, भाज्या, प्रथिने आणि चांगल्या चरबींचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते, वजन संतुलित राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

दररोज व्यायामाची सवय लावा

नियमित व्यायामामुळे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, वजन नियंत्रणात राहते आणि रक्तदाब संतुलित राहतो. आठवड्यात किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणे आवश्यक आहे. जलद चालणे, सायकलिंग आणि पोहणे हे उत्तम पर्याय आहेत.

योग्य वजन राखा

स्थूलता ही मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी महत्त्वाचा जोखीम घटक आहे. जास्त वजनामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो आणि रक्तदाबही वाढतो. योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे निरोगी वजन राखल्यास या आजारांचा धोका कमी होतो आणि मेटाबॉलिक आरोग्य सुधारते.

ताणतणाव नियंत्रणात ठेवा आणि झोपेला प्राधान्य द्या

दीर्घकालीन ताण आणि अपुरी झोप हे अनेकदा दुर्लक्षित घटक आहेत. कॉर्टिसोलसारखे ताण-हॉर्मोन्स रक्तातील साखर आणि रक्तदाब वाढवू शकतात, तर अपुरी झोप शरीराच्या मेटाबॉलिझमवर परिणाम करते. ध्यान, योगा किंवा रिलॅक्सेशन तंत्रांचा अवलंब करा आणि दररोज 7–8 तासांची चांगली झोप घ्या.

नियमित आरोग्य तपासणी करा

विशेषतः ज्यांच्या कुटुंबात या आजारांचा इतिहास आहे, त्यांनी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यांची तपासणी वेळोवेळी केल्यास आजार लवकर ओळखता येतात आणि गुंतागुंत टाळता येते. मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही. छोट्या पण सातत्यपूर्ण जीवनशैलीतील बदलांमुळे दीर्घकालीन फायदे मिळू शकतात. जागरूकता, शिस्त आणि वेळेवर घेतलेली काळजी ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

Summer special fabric: फक्त सनस्क्रीन पुरेसे नाही; गरमीपासून त्वचेला वाचायचंय? मग ‘अशा’ कपड्यांची निवड करा

Web Title: Preventing diabetes obesity and high blood pressure is possible through simple lifestyle changesimportant advice from experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • blood pressure
  • daily health tips
  • diabetes
  • Health Tips
  • Health Tips news
  • obesity

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Health Tips : मखाना खाण्याचे फायदे माहित आहेत का? शरीराला थंडावा देण्यापासून पचनासाठीही फायदेशीर….
3

Health Tips : मखाना खाण्याचे फायदे माहित आहेत का? शरीराला थंडावा देण्यापासून पचनासाठीही फायदेशीर….

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
4

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.